Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Payal Jhambre Update: पतीनंतर आता सासू-सासरेही पोलिसांच्या ताब्यात; मुकुंदनगरमधील पायल झांबरे प्रकरणातील सर्वात मोठे अपडेट!

Payal Jhambre Update: मृत्यूपूर्वी भावाला पाठवलेला तो एकच मेसेज—"माझी सासू जबाबदार आहे!" ७०-८० लाखांचा खर्च अन् दिवाळीत १० तोळे सोन्याच्या हव्यासापोटी पुण्याच्या मुकुंदनगरमध्ये उच्चशिक्षित पायलचा घात की आत्महत्या? सासू-सासरे बेड्यांत अडकल्यावर उघड होणारं ते भयानक सत्य!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 04, 2026 | 01:56 PM
Payal Jhambre Update: पतीनंतर आता सासू-सासरेही पोलिसांच्या ताब्यात; मुकुंदनगरमधील पायल झांबरे प्रकरणातील सर्वात मोठे अपडेट!

Payal Jhambre Update: पतीनंतर आता सासू-सासरेही पोलिसांच्या ताब्यात; मुकुंदनगरमधील पायल झांबरे प्रकरणातील सर्वात मोठे अपडेट!

Follow Us
Follow Us:
  • फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
  • “सासू जबाबदार आहे” असा पायलचा मेसेज
  • १० तोळे सोन्यासाठी हुंडाबळी
Payal Jhambre Update: पुण्यातील मुकुंदनगर परिसरात घडलेल्या बहुचर्चित पायल झांबरे मृत्यू प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या घटनेनंतर फरार असलेल्या पायलच्या सासू आणि सासऱ्याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. पतीला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, आता सासू-सासरेही पोलिसांच्या जाळ्यात आल्यामुळे या प्रकरणातील अनेक धक्कादायक गुपिते उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अरविंद झांबरे (सासरा) आणि मंगल झांबरे (सासू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्य आरोपी असलेला पती अक्षय झांबरेला बेड्या ठोकल्या होत्या. त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेले सासू-सासरे पोलिसांना गुंगारा देत होते, परंतु स्वारगेट पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोघांनाही अखेर आपल्या ताब्यात घेतले.

हेही वाचा: Payal Jhambre Suicide: त्या रात्री नक्की काय घडलं? सॉफ्टवेअर इंजिनिअर पायलच्या आत्महत्येमागचं थरारक आणि धक्कादायक सत्य समोर!

नेमकं प्रकरण काय?

हुंडाबळी आणि सासरच्या मंडळींकडून दिल्या जाणाऱ्या सततच्या शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून १ नोव्हेंबर रोजी २९ वर्षीय विवाहित तरुणी पायल झांबरे हिने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, मृत्यूपूर्वी पायलने आपल्या भावाला “माझी सासू या सगळ्याला जबाबदार आहे,” असा स्पष्ट मेसेज पाठवला होता. या घटनेनंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात पतीसह सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लग्नात ७० ते ८० लाख रुपये खर्च

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलच्या लग्नात माहेरच्या मंडळींनी तब्बल ७० ते ८० लाख रुपये खर्च केले होते. मात्र, तरीही सासरच्या लोकांचे समाधान झाले नव्हते. लग्नानंतर पायलकडे वारंवार सोने आणि पैशांची मागणी केली जात होती. विशेषतः दिवाळीच्या सणात १० तोळे सोनं माहेरवरून आणण्यासाठी तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकला जात होता. याच नकोशा झालेल्या त्रासाला आणि सततच्या टॉर्चरला कंटाळून पायलने टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. आता सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात आल्यामुळे या प्रकरणाचा आणखी सखोल तपास केला जात आहे.

हेही वाचा: Lonavala Tiger Point: मुसळधार पाऊस, ४०० फूट खोल दरी आणि एक फोन call;लोणावळ्यातील ‘त्या’ रात्रीचं थरारक रहस्य!

💡

Frequently Asked Questions

  • Que: पायल झांबरे प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी कोणती नवी कारवाई केली आहे?

    Ans: पोलिसांनी या प्रकरणात फरार असलेले पायलचे सासरा अरविंद झांबरे आणि सासू मंगल झांबरे यांना अटक केली आहे

  • Que: मृत्यूपूर्वी पायलने कोणाला मेसेज पाठवला होता?

    Ans: मृत्यूपूर्वी पायलने आपल्या भावाला मेसेज पाठवून "माझी सासू या सगळ्याला जबाबदार आहे," असे म्हटले होते.

  • Que: सासरच्या मंडळींकडून पायलचा कशासाठी छळ केला जात होता?

    Ans: लग्नात ७० ते ८० लाख रुपये खर्च करूनही सासरच्या लोकांची हुंड्याची हाव भागली नव्हती; शिवाय दिवाळीत १० तोळे सोन्यासाठी तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता.

Web Title: Pune swargate police arrest in laws in payal jhambre suicide case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • Dowry Prevention Act
  • pune crime news
  • Pune Suicide

संबंधित बातम्या

Payal Jhambre Suicide: त्या रात्री नक्की काय घडलं? सॉफ्टवेअर इंजिनिअर पायलच्या आत्महत्येमागचं थरारक आणि धक्कादायक सत्य समोर!
1

Payal Jhambre Suicide: त्या रात्री नक्की काय घडलं? सॉफ्टवेअर इंजिनिअर पायलच्या आत्महत्येमागचं थरारक आणि धक्कादायक सत्य समोर!

Pune Crime News: “माझी सासू जबाबदार!”- भावाला मेसेज करून पुण्यात विवाहितेचा संशयास्पद अंत!
2

Pune Crime News: “माझी सासू जबाबदार!”- भावाला मेसेज करून पुण्यात विवाहितेचा संशयास्पद अंत!

आधी तरुणी बनून मैत्री, नंतर पोलिस बनून ब्लॅकमेलिंग; पुण्यातील आत्महत्या प्रकरणाचा उलगडा
3

आधी तरुणी बनून मैत्री, नंतर पोलिस बनून ब्लॅकमेलिंग; पुण्यातील आत्महत्या प्रकरणाचा उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.