
Acid Attack: पुण्यात जुन्या वादातून मित्राच्या अंगावर फेकले ॲसिड; झटापटीत चिमुकलीसह चौघेजण गंभीर जखमी!
हेही वाचा: Fire Incident: “दिवाळीच्या दिव्यामुळे काळानं गाठलं!” धाराशिवच्या येडशीत भीषण अग्नितांडव; एकाच कुटुंबातील ६ जणांचा गुदमरून मृत्यू
नितीन सुंदर जाधव (वय ५२, रा. पांढूलमाण वस्ती, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (६ नोव्हेंबर) दुपारी चारच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमित्रा इंद्रपाल डग्ग्या (वय ५२, रा. रामनगर, येरवडा) आणि आरोपी नितीन जाधव हे दोघे परिचयाचे आहेत. सुमित्रा यांचा मुलगा हा नितीनचा मित्र असून, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. याच जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी आरोपी हातात ॲसिडसदृश पदार्थाची बाटली घेऊन सुमित्रा यांच्या घरासमोर आला. तिथे त्याने शिवीगाळ करत मुलावर ॲसिड फेकण्याचा प्रयत्न केला.
सुमित्रा यांनी आरोपीच्या हातातील बाटली झटकण्याचा व ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीदरम्यान ॲसिडचे शिंतोडे आजूबाजूला उडाले, ज्यामुळे फिर्यादी महिला, तिचा मुलगा, तसेच तिथून जाणारा एक दुचाकीस्वार आणि त्याची लहान मुलगी असे एकूण चौघेजण गंभीर जखमी झाले. या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची गंभीर दखल घेत येरवडा पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आणि अवघ्या काही वेळातच आरोपी नितीन सुंदर जाधव याला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
Ans: ही घटना पुण्याच्या येरवडा परिसरातील रामनगर भागात घडली आहे.
Ans: पोलिसांनी मुख्य आरोपी नितीन सुंदर जाधव (वय ५२) याला अटक केली आहे.
Ans: हल्ल्यादरम्यान झालेल्या झटापटीत ॲसिडचे शिंतोडे उडाल्यामुळे एका चिमुकलीसह एकूण चौघेजण जखमी झाले आहेत.