Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल...; 150 कर्मचारी तैनात
आत्तापर्यंत ३२१ हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण
२० ऑक्टोबर पर्यंत चालणार मोजणी
सुमारे दीडशे कर्मचारी कार्यरत
पुणे: पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाची वाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये विमानतळ उभारण्यात येणार असून, यापैकी कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी या तीन गावांमधील ३२१ हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. अशी माहिती पुरंदर तालुक्याच्या प्रांत वर्षा लांडगे यांनी माहिती दिली.
पुरंदर तालुक्यातील ज्या सात गावांमधील जमीन विमानतळासाठी संपादित केली जाणार आहे, त्याच्या मोजणीची सुरुवात शुक्रवार पासून करण्यात आली. रविवारचा दिवस वगळता या चार दिवसात म्हणजे आजपर्यंत ३२१ हेक्टर जमिनी प्रत्यक्ष मानवी मोजणी करण्यात आली आहे. यासाठी प्रशासनाचे म्हणजेच महसुलचे १५० कर्मचारी कार्यरत आहेत. या सातही गावातील जमिनीची मोजणी येत्या २० ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे लांडगे यांनी सांगितले.
Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित जमिनीच्या मोजणीस सुरुवात; शेतकऱ्यांना अश्रू…
विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जमीन घेण्याचे नियोजन असून, २,७०० एकरपेक्षा अधिक जमीन देण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्पास १०० टक्के शेतकरी संमती देत आहेत. तालुक्यातील सातही गावांत सरकारच्या मालकीची सुमारे दोनशे एकर जमीन आहे. त्यामुळे सुमारे २,९०० एकरपेक्षा अधिक जमीन उपलब्ध होणार आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांकडून जमिनी देण्याबाबत नकार देण्यात येत होता त्यांचे जिल्हा प्रशासनाने समुपदेशन करून जमीन देण्यास मंजुरी मिळवली आहे. मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दिवाळी नंतर प्रतक्ष्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमिनीचा रोख मोबदला जमा होणार आहे.
भूसंपादन प्रक्रिया यापूर्वी शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे अडखळली होती. त्यामुळे यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची संमती मिळाल्याने मोजणीला कोणताही विरोध झाला नाही. नवरात्र उत्सवाच्या काळात नारळ फोडून मोजणीची सुरुवात करताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावेना असा दिसला. परंतु शेतकरी मात्र छातीवर दगड ठेवून अश्रू दाबत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. गावनिहाय भूसंपादन होणारे क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे – एखतपूर २०१ हेक्टर, खानवडी २६६, कुंभारवळण २५५, मुंजवडी ७७, पारगाव १८८, उदाचीवाडी ४५ आणि वनपुरी १७५ हेक्टर.
Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित जमिनीच्या मोजणीस सुरुवात; शेतकऱ्यांना अश्रू…
विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जमीन घेण्याचे नियोजन आहे. २,७०० एकरपेक्षा अधिक जमीन देण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्पास १०० टक्के शेतकरी संमती देत आहेत. तालुक्यातील सातही गावांत सरकारच्या मालकीची सुमारे दोनशे एकर जमीन आहे. त्यामुळे सुमारे २,९०० एकरपेक्षा अधिक जमीन उपलब्ध होणार असल्याचे दिसत आहे.