Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना निर्माण झाला धोका

लातूरमध्ये केवळ ५६ टक्के, तर धाराशिवमध्ये ७० टक्के पाऊस झाला आहे. पावसाच्या कमतरतेमुळे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आणि तूर ही पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 16, 2026 | 07:56 AM
राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना धोका

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना धोका

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात १ जून ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सरासरीच्या तुलनेत केवळ ८३.५ टक्के पाऊस झाला, म्हणजेच सरासरीपेक्षा १६.५ टक्के कमी पाऊस झाला. दीर्घकाळच्या दुष्काळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे. बीडमध्ये सरासरीच्या तुलनेत ६८.५ टक्के पाऊस झाला .

सरकारने पिकांच्या परिस्थितीचा सखोल आढावा घेतला असून, बाधित भागांमध्ये देखरेख आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी अधिक तीव्र केली आहे. बीडमध्ये सरासरीच्या तुलनेत ६८.५ टक्के पाऊस झाला असून, तीन आठवड्यांपासून पावसाअभावी अंदाजे २.८५ लाख हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे. राज्यात खरीप पिकाची पेरणी १३७.०५ लाख हेक्टरवर पूर्ण झाली आहे, जे पंचवार्षिक सरासरीच्या ९५ टक्के आहे. राज्यात कृषी वापरासाठी ३९.५४ लाख टन खताची विक्री झाली असून, पुरेसा साठा उपलब्ध आहे. लातूरमध्ये केवळ ५६ टक्के, तर धाराशिवमध्ये ७० टक्के पाऊस झाला आहे. पावसाच्या कमतरतेमुळे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आणि तूर ही पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार

परभणीमध्ये ५९ टक्के पावसामुळे जवळपास सर्व तालुक्यांतील पिकांवर परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गडचिरोली जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी ४७.३ मिमी पावसाची नोंद झाली. देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक १४२ मिमी, तर देसाईगंज पर्जन्यमापक मंडळात तब्बल १४५ मिमी पाऊस झाला. शंकरपूर येथेही १३९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दोन ठिकाणी अतिवृष्टी, तर पाच पर्जन्यमापक मंडळांत जोरदार पाऊस झाला.

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. ऑगस्टनंतर पावसाने उघडीप घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी उन्हाचा कडाका देखील अनुभवत आहे. असे असताना आता विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित भागांत हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Web Title: 16 less rainfall than average in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 07:56 AM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

पाऊस गायब, कडक ऊन अन् सुकलेली पिके; धाराशिवमध्ये सप्टेंबर महिन्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती
1

पाऊस गायब, कडक ऊन अन् सुकलेली पिके; धाराशिवमध्ये सप्टेंबर महिन्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस
2

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार
3

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार

Himalayan Crisis : हिमालयाचा ‘काऊंटडाऊन’ सुरू? हिमनद्या वेगाने वितळल्याने लाखो लोक धोक्यात
4

Himalayan Crisis : हिमालयाचा ‘काऊंटडाऊन’ सुरू? हिमनद्या वेगाने वितळल्याने लाखो लोक धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.