Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थकीत ऊसबिल अन् रिकव्हरी चोरीवरुन राजू शेट्टी आक्रमक; साखर आयुक्तांकडे केल्या ‘या’ मोठ्या मागण्या

राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत एफआरपीची (FRP) चुकीची आकडेवारी साखर आयुक्त कार्यालयाला सादर केली असून, अशा कारखान्यांवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 07, 2026 | 06:26 PM
थकीत ऊसबिल अन् रिकव्हरी चोरीवरुन राजू शेट्टी आक्रमक; साखर आयुक्तांकडे केल्या 'या' मोठ्या मागण्या

थकीत ऊसबिल अन् रिकव्हरी चोरीवरुन राजू शेट्टी आक्रमक; साखर आयुक्तांकडे केल्या 'या' मोठ्या मागण्या

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत एफआरपीची (FRP) चुकीची आकडेवारी साखर आयुक्त कार्यालयाला सादर केली असून, अशा कारखान्यांवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. थकीत ऊसबिलासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कार्यालयात राज्याचे साखर आयुक्त डॅा. संजय कोलते यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत राजू शेट्टी यांनी साखर उद्योगातील गैरव्यवहार आणि शेतकऱ्यांच्या लुटीकडे प्रशासनाचे लक्ष वेधत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.

राज्यातील कारखान्यांनी सादर केलेली थकीत एफआरपीची आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये मोठी तफावत आहे. कारखानदार दिशाभूल करत असून आयुक्त कार्यालयाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित कारखान्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेट्टी यांनी केली. तसेच, राज्य सरकारच्या दोन किंवा तीन टप्यातील एफआरपीच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या तीन वर्षांत ज्या कारखान्यांनी दोन ते तीन टप्प्यांत एफआरपी दिली, त्यांनी विलंबाच्या कालावधीचे व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

उसाचे वजन आणि रिकव्हरी (उतारा) यामध्ये होणारी चोरी हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सर्व वजनकाटे तातडीने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन जोडले जावेत, जेणेकरून काटामारीला आळा बसेल. यासोबतच, मराठवाड्यातील कारखान्यांमध्ये रिकव्हरी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, ते रोखण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने तिथे स्वतंत्र तपासणी यंत्रणा उभारावी, अशी मागणी करण्यात आली.

उसाच्या वजनात होणारे गैरप्रकार आणि बोगस नोंदी टाळण्यासाठी एका महत्त्वाच्या उपाययोजनेची मागणी बैठकीत करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांच्या नावे प्रत्येक हंगामात ५०० टनांपेक्षा जास्त ऊस दाखवला जातो, अशा संशयास्पद वाटणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची नावे प्रत्येक हंगामात सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात यावीत, जेणेकरून पारदर्शकता राहील. चालू गळीत हंगामात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे तसेच उपपदार्थांचे (बाय-प्रॉडक्ट्स) दर वाढले आहेत. त्यामुळे कारखान्यांचा नफा वाढला असून, त्यांनी शेतकऱ्यांना प्रतिटन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा. तसेच देशात आणि राज्यात साखरेचा पुरेसा शिल्लक साठा उपलब्ध असल्यामुळे केंद्र सरकारने कोणत्याही परिस्थितीत साखर आयात करण्याचा निर्णय घेऊ नये, असे स्वाभिमानीने स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : लोणावळ्यात बार्टीची पार्टी की कार्यशाळा? तब्बल 39 लाखांच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह

यावेळी राजू शेट्टी यांनी राजकीय व्यवस्थेवरही कडाडून टीका केली. राज्याच्या सहकार मंत्र्यांच्याच साखर कारखान्याने शेतकऱ्यांची एफआरपी दिली नसल्याचा आरोप करत, “जर सहकार मंत्रीच नियम पाळत नसतील, तर प्रशासन कायदेशीर कारवाई नक्की कोणावर करणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या बैठकीला ॲड. योगेश पांडे , प्रभाकर बांगर यांच्यासह साखर आयुक्त कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Raju shetti has made major demands to the sugar commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • pune news
  • Raju Shetti
  • Sugarcane Bill

संबंधित बातम्या

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
1

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश
2

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
4

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.