Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravindra Dhangekar: धंगेकरांचा चौथा पक्ष बदल; दर आठ दहा वर्षांनी पक्षांतरे; ‘या’ नेत्यांसोबत बसावे लागणार

राजकीय वर्तुळात अशाही चर्चा रंगलेल्या होत्या की लोकसभेत पराभूत झाल्या पासूनच धंगेकर हे नव्या घराच्या शोधात होते. काँग्रेसमध्ये आपल्याला फारसा वाव नाही किंवा या पक्षालाच राज्यात फारसे भवितव्य नाही, असे ध्यानात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 11, 2025 | 10:45 PM
Ravindra Dhangekar: धंगेकरांचा चौथा पक्ष बदल; दर आठ दहा वर्षांनी पक्षांतरे; 'या' नेत्यांसोबत बसावे लागणार

Ravindra Dhangekar: धंगेकरांचा चौथा पक्ष बदल; दर आठ दहा वर्षांनी पक्षांतरे; 'या' नेत्यांसोबत बसावे लागणार

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: रवीन्द्र धंगेकर हे तरूण वयात शिवसेनेचे पुण्यातील नगरसेवक बनले आणि दहा वर्षे ते बाळासाहेब ठाकरेंसोबत राहिले. जेंव्हा बाळासाहेबांची साथ सोडून राज ठाकरे बाहेर पडले तेंव्हा धंगेकर हे मनसेत गेले. तिथून ते पुणे मनपाचे नगरसेवक बनले. 2009 व 2014 ची विधानसबेची निवडणूक धंगेकरांनी इंजिनावर ,कसाबा पेठ विधानसभा मतदारसंघातून, लढवली. पण गिरीश बापटांपुढे त्यांचा निभाव लागला नाही.

मग ते मनसे सोडून बाहेर पडले आणि कसब्यातून पुणे महापालिकेत अपक्ष म्हणून दाखल झाले. तिथे त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. नंतर ते रीतसर काँग्रेसमध्ये दखलही झाले. 2017 ते आता पर्यंत काँग्रेसमध्ये राहिलेल्या धंगेकरांनी पुन्हा एकदा धनुष्य बाण हाती घेतला आहे. पण ते या वेळी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात दाखल होत आहेत.

धंगेकरांनी या आधी दर आठ दहा वर्षांनी पक्षांतरे केली आहेत. ते आता चौथ्या पक्षात येत आहेत. इथे ते काय करतात, किती टिकतात याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले असेल. गिरीश बापट यांनी लोकसभा लढवल्या नंतर त्यांच्या जागी पक्षाने 2019 मध्ये मुक्ता टिळक यांना संधी दिली.  दुर्दैवाने टिळकताई दुर्धर आजाराला बळी पडल्या. त्यांच्या रिक्त  जागेसाठी पोट निवडणूक लागली तेंव्हा भाजपाने टिळक व बापट कुटंबियांना डावलून हेमंत रासनेंना संधी दिली. बापट टिळकांच्या समर्थकांना ते आवडले नव्हते, हे कसबा विधासनभा पोट निवडणुकीच्या निकालाने दिसले.

ती पोट निवडणूक जिंकून धंगेकर हे काँग्रेससाठी मोठेच हीरो ठरले. कारण 1995 पासूनची 28  वर्षांची भाजपाची सलग विजयी मालिका धंगेकरांनी तोडून दाखवली होती. सहाजिकच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गाडगिळांना डावलून काँग्रेस श्रेष्ठींनी धंगेकरांना लढण्याची संधी दिली. पण मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा पराभव करणे ही धंगेकर व काँग्रेसाठी अवघड गोष्ट ठरली. पुढे सहा महिन्यांनी झालेल्या कसबा विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीतही धंगेकरांनी हाताच्या चिन्हावर तिकीट मिळवले. पण भाजपाच्या हेमंत रासनेंनी 90 हजार मते घेतली. धंगेकरांना सत्तर हजार मतांवरच समाधान मानावे लागले.

पुणे लोकसभा निवडणुकीत रवीन्द्र धंगेकरांचा पराभव जवळपास सव्वा लाखांच् फरकाने केंद्रीय  राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला. त्या निवडणुकीत धंगेकरांनी हवा मात्र जोरदार तयार केली होती. काँग्रेसची मते 2019 च्या निवडणुकीच्या मानाने 12 टक्क्यांनी वाढली खरी, पण धंगेकरांच्या कसबा मतदार संघातही आघाडी घेता आली नाही. अर्थात 2019 च्या निवडणुकीत मोहन जोशींचा पराभव तब्बल 3.24 लाखांच्या फरकाने कै. गिरीश बापटांनी केला होता. त्या मानाने धंगेकरांच्या पराभवाचे कौतुकच करावे लागेल…!

Ravindra Dhangekar Leave congress: मोठी बातमी! पुण्यात काँग्रेसच्या गडाला सुरूंग; रवींद्र धंगेकर धनुष्यबाण हाती घेणार

भाजपमध्ये डाळ शिजली नाही?

राजकीय वर्तुळात अशाही चर्चा रंगलेल्या होत्या की लोकसभेत पराभूत झाल्या पासूनच धंगेकर हे नव्या घराच्या शोधात होते. काँग्रेसमध्ये आपल्याला फारसा वाव नाही किंवा या पक्षालाच राज्यात फारसे भवितव्य नाही, असे त्यांच्या ध्यानात आले असावे. विधानसभा निवडणुकी आधीही त्यांनी देवेन्द्र फडणवीसांचे दरवाजे ठोठावले होते. पण तिथे त्यांची डाळ शिजली नाही. असे म्हणतात की फडणवीसांनी त्यांना सुनावेल की तुम्ही तर तीन वेळा आमच्या पक्ष उमेदवारांच्या विरोधातच लढला आहात. तुम्हाला आम्ही कसब्यातून संधी देऊच शकत नाही. मग धंगेकर एकनाथ शिंदेंकडे गेले पण तिथे विधानसभा निवडणुकी आधी संधी मिळाली नाही. आता, फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला तीन महिने पूर्ण झाल्यानंतर नाराज शिंदे शिवसेनेचा विस्तार कऱण्याचा आणखी प्रयत्न करत असताना धंगेकर हे सत्तारूढ माहायुतीत दाखल होतील. ज्या हेमंत रासने व मुरलीधर अण्णा मोहोळांच्या विरोधात धंगेकर पुण्याच्या राजकारणात आजवर लढले त्यांच्याशीच आता जुळवून घ्यावे लागणार आहे.

कोट
‘‘ माजी अामदार रवींद्र धंगेकर हे लाेकांमध्ये काम करणारा कार्यकर्ता अाहे. त्यांच्या जनसंपर्काचा पक्षाच्या संघटनवाढीला निश्चित फायदा हाेईल. त्यांचे मी पक्षात स्वागतच करताे,’’ अशी प्रतिक्रीया शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमाेद उर्फ नाना भानगिरे यांनी दिली.

Web Title: Ravindra dhangekar join shivsena party pune kasba maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 10:45 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील गणेश मंडळांचा ‘हा’ वाद अखेर मिटला; मंत्री मोहोळांच्या पुढाकराने सुटला प्रश्न
1

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील गणेश मंडळांचा ‘हा’ वाद अखेर मिटला; मंत्री मोहोळांच्या पुढाकराने सुटला प्रश्न

Pune human skeleton on road : भररस्त्यामध्ये आढळला मानवी सांगाडा; पुणेकर भयभीत तर पोलिसांची उडाली धांदल, नेमकं खरं काय?
2

Pune human skeleton on road : भररस्त्यामध्ये आढळला मानवी सांगाडा; पुणेकर भयभीत तर पोलिसांची उडाली धांदल, नेमकं खरं काय?

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत
3

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत

अभियोग्यता चाचणीत गोंधळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश; 187 विद्यार्थ्यांना शून्य मार्क…
4

अभियोग्यता चाचणीत गोंधळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश; 187 विद्यार्थ्यांना शून्य मार्क…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.