Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांनो सावधान ! पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज

पुणे शहर आणि परिसरात बुधवारी (ता. १) कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान २२.१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती आणि दिवसभर शहर व उपनगरांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी सुरू राहिल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 02, 2026 | 02:34 PM
पुण्यात पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट

पुण्यात पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट

Follow Us
Follow Us:

पुणे : शहर आणि परिसरात नैऋत्य मोसमी पावसाने पुन्हा प्रगती करत दिलासादायक सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिवसभर झालेल्या संततधारेमुळे मोठा दिलासा मिळाला. बुधवारी (दि.1) देखील शहरात दिवसभर अधूनमधून रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या, तर काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली.

हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार, बंगाल उपसागर ते ईशान्य अरबी समुद्रापर्यंत वरच्या पातळीवर द्रोणीय रेषा (ट्रफ) सक्रिय आहे. या प्रणालीमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

पुणे शहर आणि परिसरात बुधवारी (ता. १) कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान २२.१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती आणि दिवसभर शहर व उपनगरांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी सुरू राहिल्या. त्यामुळे हवामानात गारवा निर्माण होऊन वातावरण आल्हाददायक झाले.

गुरुवारी (ता. २) कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान २२ अंश राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार, आकाश सामान्यतः ढगाळ राहिल्याचे दिसून आले. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार, पाऊस होताना दिसत आहे. घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील तीन दिवस घाटमाथा परिसरात रेड अलर्ट कायम राहणार आहे.

पावसाची नोंद

ठिकाण – पाऊस (मिमी)

गिरिवन – ३४.०
भोर – २०.०
चिंचवड – ११.५
पाषाण – ११.०
शिवाजीनगर – १०.०
दापोडी – ९.५
तळेगाव – ८.५
एनडीए – ६.५
राजगुरुनगर – ६.०
माळीन – ६.०
हडपसर – ४.५
दुधुळगाव – ३.५
निमगिरी – ३.०
शिरूर – १.५
दौंड – ०.५

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो तयार राहा ! दोन दिवस पावसाची विश्रांती, पण 1 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

Web Title: Red alert for rain in pune for the next three days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Climate Change
  • Pune Weather
  • Rain Update

संबंधित बातम्या

Navi Mumbai News : नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात करंट; दोन विद्यार्थिनी जखमी, महावितरणचा प्राथमिक अहवाल समोर
1

Navi Mumbai News : नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात करंट; दोन विद्यार्थिनी जखमी, महावितरणचा प्राथमिक अहवाल समोर

Maharashtra Rain Alert : आता नुसता धो धो पाऊस बरसणार! राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Rain Alert : आता नुसता धो धो पाऊस बरसणार! राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

काळजी घ्या ! देशातील हवामानात होतोय कमालीचा बदल; बालकांवर गंभीर परिणाम
3

काळजी घ्या ! देशातील हवामानात होतोय कमालीचा बदल; बालकांवर गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.