Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune शहरावरील वाढीव पाणीकपातीचे संकट तूर्त टळले; पाण्याचे वर्षभराचे नियोजन होणार?

Pune: पाटबंधारे विभागाकडून मंजूर पाण्याचा कोटा, धरणांमधील उपलब्ध साठा, वाढती लोकसंख्या आणि वितरणादरम्यान होणारी पाण्याची गळती यांचा आढावा घेऊन वर्षभराचे नियोजन करावे, असे प्रस्तावात म्हटले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 27, 2026 | 08:37 PM
दहा टक्क्यांच्या वर पाणीकपात होणार नाही

दहा टक्क्यांच्या वर पाणीकपात होणार नाही

Follow Us
Follow Us:
  • पाणीकपातीऐवजी नियमित पुरवठ्यावर भर
  • शहर आणि समाविष्ट गावांना समान पाणीवाटप
  • दहा टक्क्यांच्या वर पाणीकपात होणार नाही
Pune/Water Supply: पुणे शहराची वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण आणि पावसाची अनिश्चितता लक्षात घेता पुणे महापालिकेसमोर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे आव्हान वाढत आहे. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळून पुणेकरांना वर्षभर नियमित पाणीपुरवठा करता यावा, यासाठी सर्वसमावेशक जलव्यवस्थापन आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. स्थायी समितीचे नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड यांनी पुणे शहर, उपनगरे आणि नव्याने समाविष्ट गावांसाठी वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची मागणी केली आहे.

पाणीकपाती ऐवजी नियमित पुरवठ्यावर भर

सध्या शहरात पाण्याची गंभीर टंचाई नसली, तरी भविष्यातील संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, जलवाहिन्यांमधील गळती रोखणे, पाण्याची नासाडी टाळणे आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर यावर भर देण्यात आला आहे. आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवणे किंवा एक दिवसाआड पाणी देण्यासारख्या पर्यायांऐवजी दररोज कमी वेळ नियमित पाणीपुरवठा करता येईल का, याचा तांत्रिक आणि व्यावहारिक अभ्यास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट! १० तालुके दुष्काळग्रस्त; टँकरग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता

शहर आणि समाविष्ट गावांना समान पाणीवाटप

पाटबंधारे विभागाकडून मंजूर पाण्याचा कोटा, धरणांमधील उपलब्ध साठा, वाढती लोकसंख्या आणि वितरणादरम्यान होणारी पाण्याची गळती यांचा आढावा घेऊन वर्षभराचे नियोजन करावे, असे प्रस्तावात म्हटले आहे. शहर, उपनगरे आणि समाविष्ट गावांमध्ये लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती आणि वितरण क्षमतेनुसार पारदर्शक निकष ठरवून पाण्याचे समान वाटप करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सहभागातून पाणीबचत

‘पाणी वाचवा, पुणे वाचवा’ अभियान राबवून नागरिकांना घरगुती पाणीबचत, नळांची गळती रोखणे आणि पाण्याची नासाडी टाळण्याबाबत जागरूक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या जलपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, उद्यान व बांधकाम विभागासह पाटबंधारे विभागामध्ये समन्वय साधण्यावरही भर देण्यात आला आहे.

Maharashtra Drought: देवाक काळजी रे! ‘या’ जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई; तातडीने पाण्याचे…

दहा टक्क्यांच्या वर पाणीकपात होणार नाही

पुणेकरांवरील वाढीव पाणीकपातीचे संकट तूर्त टळले आहे. कालवा समितीची बैठक होईपर्यंत शहरातील सध्याची १० टक्के पाणीकपात वाढवू नये, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. सिंचन विभागाने पुणे महापालिकेला मंजूर केलेल्या पाण्याच्या कोट्यावर महापौरांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शहर, उपनगरे आणि नव्याने समाविष्ट गावांना वर्षभर नियमित व समान पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वंकष जलव्यवस्थापन आराखडा तयार करण्याची मागणी स्थायी समितीचे नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड यांनी केली आहे. शहराची गरज लक्षात घेता मागील वर्षाप्रमाणे किमान १६ टीएमसी पाणी मिळावे, अशी महापालिकेची भूमिका आहे. त्यामुळे मंजूर कोट्यात सुमारे पाच टीएमसीची तूट असल्याचे स्पष्ट होत आहे. धरणांमध्ये सध्या सुमारे २४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असतानाही पुण्यासाठी कमी कोटा मंजूर झाल्याने पाणीकपातीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात वाढीव पाणीकपात होणार का?

    Ans: पुण्यात सध्या 10 टक्क्याच्या वर पाणी कपात होणार नाही.

  • Que: पाणीकपाती ऐवजी अन्य पर्याय काय आहेत?

    Ans: उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, जलवाहिन्यांमधील गळती रोखणे, पाण्याची नासाडी टाळणे आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर यावर भर दिला जाईल.

Web Title: No water cut above 10 percent to pune city relief to people maharashtra drought 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 08:37 PM

Topics:  

  • Khadakwasla Dam
  • Maharashtra Drought 2026
  • Pune mahapalika
  • Water supply

संबंधित बातम्या

Mira Bhayandar मध्ये पाणीटंचाईचा भडका! १० टक्के कपातीच्या नावाखाली प्रत्यक्षात १५ टक्क्यांहून अधिक कपात?
1

Mira Bhayandar मध्ये पाणीटंचाईचा भडका! १० टक्के कपातीच्या नावाखाली प्रत्यक्षात १५ टक्क्यांहून अधिक कपात?

शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कारवाई अटळ! कर्जवसुली एजंटांना Eknath Shinde यांचा इशारा
2

शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कारवाई अटळ! कर्जवसुली एजंटांना Eknath Shinde यांचा इशारा

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’ एकनाथ शिंदेंचा शब्द, कर्जवसुली करणाऱ्यांना दिला सज्जड दम
3

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’ एकनाथ शिंदेंचा शब्द, कर्जवसुली करणाऱ्यांना दिला सज्जड दम

Maharashtra Drought: देवाक काळजी रे! ‘या’ जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई; तातडीने पाण्याचे…
4

Maharashtra Drought: देवाक काळजी रे! ‘या’ जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई; तातडीने पाण्याचे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.