Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य प्रमुखांकडून क्षेत्रीय कार्यालयांची झाडाझडती

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सातत्याने अंमलबजावणी करावी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असेही डॉ. बोराडे यांनी स्पष्ट केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 04, 2026 | 11:38 AM
पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य प्रमुखांकडून क्षेत्रीय कार्यालयांची झाडाझडती

पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य प्रमुखांकडून क्षेत्रीय कार्यालयांची झाडाझडती

Follow Us
Follow Us:
  • पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ
  • ऑक्टोबरमध्ये ८४३ डेंग्यू रुग्ण
  • महापालिका आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग
पुणे : शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तीव्रता वाढविली आहे. ऑक्टोबर महिन्यात शहरात डेंग्यूचे तब्बल ८४३ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी विविध क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देत डेंग्यू नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच कामकाजात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या पाहणीदरम्यान क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य, बांधकाम, अतिक्रमण, घनकचरा आणि पाणीपुरवठा विभागांच्या कामकाजाची तपासणी करण्यात आली. नगर रोड, येरवडा, औंध-बाणेर, ढोले पाटील, शिवाजीनगर-घोले रोड, बिबवेवाडी, सिंहगड रोड, विश्रामबागवाडा आणि कसबा पेठ या क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्यात आल्या. संबंधित सहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत संयुक्त बैठका घेऊन डेंग्यू नियंत्रणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसरातील स्वच्छता, पाणी साचणारी ठिकाणे आणि संभाव्य डासोत्पत्ती स्थळांवर नियमित लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सातत्याने अंमलबजावणी करावी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असेही डॉ. बोराडे यांनी स्पष्ट केले.

औंध-बाणेरमध्ये सर्वाधिक रुग्ण

ऑक्टोबरमधील रुग्णसंख्येचा विचार करता औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक १५२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल येरवडा-वडगाव शेरीत ११०, केशवनगरमध्ये ७४, कोथरूडमध्ये ७३, नगर रोड-वाघोलीत ७१, कोंढवा-उंड्रीत ६५ आणि सिंहगड रोड परिसरात ५५ रुग्ण आढळले. शिवाजीनगर-घोले रोडमध्ये ३३, धनकवडी-सहकारनगरमध्ये २२, तर वानवडी आणि कसबा-विश्रामबागवाडा परिसरात प्रत्येकी २१ रुग्णांची नोंद झाली.

उपाययोजनांची नियमित अंमलबजावणी करणे आवश्यक

‘डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांची नियमित अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. डासोत्पत्ती होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी सतर्क राहून आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी.’

– डॉ. नीना बोराडे, आरोग्य प्रमुख

FAQ

1. पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे का?
होय. ऑक्टोबर महिन्यात पुणे शहरात डेंग्यूचे ८४३ रुग्ण आढळले आहेत.

2. डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने काय केले?
महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तीव्रता वाढविली आहे.

3. डेंग्यू नियंत्रणासाठी पाहणी कोणी केली?
महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी विविध क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन उपाययोजनांचा आढावा घेतला.

Web Title: Rise in dengue cases in pune city nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

पुणे रेल्वेस्थानकाची सुरक्षा कडक; पाच लगेज स्कॅनर, प्रवाशांच्या तपासणीसाठी 19 मेटल डिटेक्टर
1

पुणे रेल्वेस्थानकाची सुरक्षा कडक; पाच लगेज स्कॅनर, प्रवाशांच्या तपासणीसाठी 19 मेटल डिटेक्टर

Diwali 2026: मातीच्या किल्ल्यांची जादू कायम, रेडिमेडचा नवा ट्रेंडही लोकप्रिय! पुण्यात दिवाळीचा उत्साह
2

Diwali 2026: मातीच्या किल्ल्यांची जादू कायम, रेडिमेडचा नवा ट्रेंडही लोकप्रिय! पुण्यात दिवाळीचा उत्साह

Pimpri Chinchwad News : गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना आवाहन
3

Pimpri Chinchwad News : गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना आवाहन

Cricket News: पुण्यातील १९ वर्षांखालील क्रिकेटचा थरार! ‘या’ संघांची सेमीफायनलमध्ये शानदार धडक
4

Cricket News: पुण्यातील १९ वर्षांखालील क्रिकेटचा थरार! ‘या’ संघांची सेमीफायनलमध्ये शानदार धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.