Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे रेल्वेस्थानकाची सुरक्षा कडक; पाच लगेज स्कॅनर, प्रवाशांच्या तपासणीसाठी 19 मेटल डिटेक्टर

स्थानकातील सुरक्षा व्यवस्था प्रभावी करण्यासाठी सर्व अनधिकृत प्रवेशमार्ग बंद करण्यात आले आहेत. निर्धारित प्रवेशद्वारांमधूनच स्थानकात प्रवेश करणे आणि निश्चित केलेल्या मार्गानेच बाहेर पडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 04, 2026 | 11:09 AM
पुणे रेल्वेस्थानकाची सुरक्षा कडक; पाच लगेज स्कॅनर, प्रवाशांच्या तपासणीसाठी 19 मेटल डिटेक्टर

पुणे रेल्वेस्थानकाची सुरक्षा कडक; पाच लगेज स्कॅनर, प्रवाशांच्या तपासणीसाठी 19 मेटल डिटेक्टर

Follow Us
Follow Us:
  • पुणे रेल्वेस्थानकाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक
  • वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन नियोजन
  • सामान तपासणीसाठी ५ लगेज स्कॅनर
  • प्रवाशांच्या तपासणीसाठी १९ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर
पुणे : पुणे रेल्वेस्थानकावरील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासह प्रवाशांच्या ये-जा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने स्थानकावरील प्रवेश आणि निर्गमन मार्ग स्वतंत्र केले असून, सामानाच्या तपासणीसाठी पाच लगेज स्कॅनर आणि प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीसाठी १९ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसविले आहेत.

स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासह छत्री गेट आणि ताडीवाला रोडच्या बाजूने प्रवाशांच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी होणारी कोंडी टाळण्यास आणि प्रवाशांची वाहतूक अधिक शिस्तबद्ध करण्यास मदत होणार आहे. छत्री गेट येथे फलाट क्रमांक एक ते सहावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र प्रवेशमार्ग तयार करण्यात आला आहे. तसेच, स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र निर्गमन मार्गाची व्यवस्था केली आहे.

अनधिकृत प्रवेशमार्ग बंद

स्थानकातील सुरक्षा व्यवस्था प्रभावी करण्यासाठी सर्व अनधिकृत प्रवेशमार्ग बंद करण्यात आले आहेत. निर्धारित प्रवेशद्वारांमधूनच स्थानकात प्रवेश करणे आणि निश्चित केलेल्या मार्गानेच बाहेर पडणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरक्षा तपासणीच्या वेळी रेल्वे अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सामानाचीही तपासणी

स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी पाच लगेज स्कॅनरची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, प्रवाशांची तपासणी करण्यासाठी १९ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे संशयास्पद वस्तूंची तपासणी करणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणे अधिक सोयीचे होणार आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाने निश्चित केलेल्या प्रवेश आणि निर्गमन मार्गांचा वापर करून सुरक्षा तपासणीस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सुरक्षा व्यवस्थेचा तपशील

५ – लगेज स्कॅनर
१९ – डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर
३ ठिकाणे – मुख्य प्रवेशद्वार, छत्री गेट आणि ताडीवाला रोड
अनधिकृत प्रवेशमार्ग – सर्व बंद
फलाट – क्रमांक १ ते ६ साठी छत्री गेटवर स्वतंत्र प्रवेशमार्ग

FAQ

1. पुणे रेल्वेस्थानकावरील सुरक्षा व्यवस्था का कडक करण्यात आली आहे?
वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांची सुरक्षा आणि ये-जा अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे.

2. पुणे रेल्वेस्थानकावर किती लगेज स्कॅनर बसविण्यात आले आहेत?
सामानाच्या तपासणीसाठी पाच लगेज स्कॅनर बसविण्यात आले आहेत.

3. प्रवाशांच्या तपासणीसाठी किती मेटल डिटेक्टर आहेत?
प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीसाठी १९ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत.

Web Title: Security tightened at pune railway station five luggage scanners and 19 metal detectors in place nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • pune news
  • Pune Railway Station News

संबंधित बातम्या

पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य प्रमुखांकडून क्षेत्रीय कार्यालयांची झाडाझडती
1

पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य प्रमुखांकडून क्षेत्रीय कार्यालयांची झाडाझडती

Diwali 2026: मातीच्या किल्ल्यांची जादू कायम, रेडिमेडचा नवा ट्रेंडही लोकप्रिय! पुण्यात दिवाळीचा उत्साह
2

Diwali 2026: मातीच्या किल्ल्यांची जादू कायम, रेडिमेडचा नवा ट्रेंडही लोकप्रिय! पुण्यात दिवाळीचा उत्साह

Pimpri Chinchwad News : गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना आवाहन
3

Pimpri Chinchwad News : गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना आवाहन

Cricket News: पुण्यातील १९ वर्षांखालील क्रिकेटचा थरार! ‘या’ संघांची सेमीफायनलमध्ये शानदार धडक
4

Cricket News: पुण्यातील १९ वर्षांखालील क्रिकेटचा थरार! ‘या’ संघांची सेमीफायनलमध्ये शानदार धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.