Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विविध मागण्यांसाठी RTO कर्मचारी जाणार बेमुदत संपावर; आधी 2 जूनला निदर्शने करणार अन् नंतर…

मोटार वाहन विभागातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवाप्रवेश नियम तयार करण्याची विनंतीस साडेचार वर्षे झाली तरी अद्याप कोणताही निर्णय नाही. सेवाप्रवेश नियम उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून कर्मचाऱ्यांनी नियमित पदोन्नती नाकारली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 30, 2026 | 03:03 PM
विविध मागण्यांसाठी RTO कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

विविध मागण्यांसाठी RTO कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यभरातील मोटार वाहन विभागातील लिपिक वर्गातील कर्मचारी प्रलंबित मागण्यांच्या प्रतीक्षेत असून, प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. परिवहन मंत्र्यांनी दिलेले निर्देशही पाळले जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. मागण्या मान्य न झाल्यास २ जून रोजी निदर्शने, तर ९ जून रोजी एक दिवसीय संप हे करूनही प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही तर १६ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेकडून दिला आहे.

मोटार वाहन विभागातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवाप्रवेश नियम तयार करण्याची विनंतीस साडेचार वर्षे झाली तरी अद्याप कोणताही निर्णय नाही. सेवाप्रवेश नियम उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून कर्मचाऱ्यांनी नियमित पदोन्नती नाकारली जात असून, याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला. ऑक्टोबर २०२५ मध्ये परिवहन आयुक्त कार्यालयाच्या आवारात साखळी उपोषणही केले. त्यावेळी उपलेखापाल, कनिष्ठ लेखापरीक्षक, मुख्य लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या पदांवरील कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन अधीक्षक पदावर तीन महिन्यांची तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना देऊन तात्कालिक दिलासा दिला. मात्र, कालावधी संपताच पदोन्नती काढण्यात आली.

हे सुद्धा वाचा : “सुसंस्कृत महाराष्ट्राची ‘उडता महाराष्ट्र’ कडे वाटचाल,” पुणे विषारी दारू प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान !

या अन्यायकारक धोरणाविरोधात संघटनेने एप्रिल २०२६ रोजी लेखी पत्राद्वारे प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या तीव्र भावना कळवल्या आहेत. परिवहनमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या प्रशासनाविरोधात आता कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मंत्रालयस्तरावरील प्रलंबित पदोन्नती, सेवाप्रवेश नियम तयार करणे, पदनाम बदल, आश्वासित प्रगती योजना आणि बदली व प्रतिनियुक्ती नियम या प्रमुख मागण्या संघटनेचे सरचिटणीस सुरेद्र सरतापे यांनी केल्या आहेत.

RTO ने घेतला सक्तीचा निर्णय

जुन्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या बाजारात चालणारा अनधिकृत दलालांचा सुळसुळाट, ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) परवाने घेणे सक्तीचा केला आहे. केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार, जुन्या वाहनांची खरेदी-विक्री किंवा एक्सचेंजचा व्यवसाय करणाऱ्यांनी रीतसर मान्यता घेणे कायदेशीररित्या बंधनकारक असून, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

“भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आश्रयाशिवाय अवैध दारू व्यवसाय शक्य नाही”; राष्ट्रवादीच्या रोहन सुरवसे पाटलांचा आरोप

Web Title: Rto employees to go on indefinite strike over various demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Employees Strike
  • RTO Office

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.