Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सासवड नगरपरिषद निवडणूक होणार रंगतदार; संजय जगतापांसमोर असणार ‘हे’ आव्हान

भाजपमध्ये पूर्वाश्रमीचे अनेक नेते, कार्यकर्ते असून सासवडसह तालुक्यात भाजपची सत्ता नसली तरी  भाजपचे कमळ अखंडपणे फुलवत ठेवण्याचे काम केले आहे. त्यांना मोठा आधार मिळाला असून सत्तेतील स्वप्ने पूर्ण होण्याची त्यांना आशा आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 15, 2025 | 02:35 AM
सासवड नगरपरिषद निवडणूक होणार रंगतदार; संजय जगतापांसमोर असणार ‘हे’ आव्हान
Follow Us
Close
Follow Us:

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोनच दिवस बाकी
अद्याप राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले नाही
भाजपमधील कार्यकर्त्यांना द्यावा लागणार न्याय

सासवड /संभाजी महामुनी:  सासवड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोनच दिवस बाकी असूनही अद्याप राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले नाहीत. यापूर्वी सर्व निर्णय एकहाती घेणाऱ्या राजकीय नेत्यांसमोर उमेदवारांची नावे जाहीर करताना प्रथमच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी भाजपचे उमेदवार जाहीर करताना माजी आमदार संजय जगताप यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे

यापूर्वी कॉंग्रेसच्या राजवटीत कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला कुठे उमेदवारी द्यायची किंवा बसवायचे याचे सर्व निर्णय संजय जगताप एकहाती घेत असत. तसेच याच निर्णयामुळे सासवड नगर परिषद एकहाती ठेवण्यास कोणतीच अडचण आली नाही. मात्र यावेळी उमेदवारांची नावे जाहीर करताना  प्रथमच सर्वाना विश्वासात घेताना दमछाक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संजय जगताप यांनी काही दिवसापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली. आता निवडणूक कार्यक्रम सुरु असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोनच दिवस बाकी आहेत. मात्र तरीही उमेदवारांची नावे जाहीर होत नसल्याने मोठ्या प्रमाणात सस्पेन्स वाढला आहे.

Saswad News: सासवड नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराला चाप कधी बसणार?

भाजपमधील कार्यकर्त्यांना द्यावा लागणार न्याय . ,,,,

यापूर्वी आमदार विजय शिवतारे यांनी महायुतीत असताना भाजपच्या मतांचा वापर पुरेपूर केला असला तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीने न्याय देवू शकले नाहीत. त्यामुळेच विधानसभा निवडणुक काळात सासवड मधील भाजपच्या नेत्यांनी विजय शिवतारे यांच्यावर आगपाखड केली होती. यावेळी भाजपचे चित्र पूर्णपणे वेगळे असून विजय शिवतारे भाजपच्या उघडपणे विरोधात असून संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना संजय जगताप यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

भाजपमध्ये पूर्वाश्रमीचे अनेक नेते, कार्यकर्ते असून सासवडसह तालुक्यात भाजपची सत्ता नसली तरी  भाजपचे कमळ अखंडपणे फुलवत ठेवण्याचे काम केले आहे. आता त्यांना मोठा आधार मिळाला असून सत्तेतील स्वप्ने पूर्ण होण्याची त्यांना आशा आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी संजय जगताप यांच्याकडे गळ घातली आहे. मात्र प्रत्येकवेळी आपल्या सोयीप्रमाणे निर्णय घेण्याच्या पद्धतीला फाटा देवून जुन्या नव्यांची सांगड घालीत सर्वाना बरोबर घेवून जावे लागणार आहे. भाजपच्या पूर्वाश्रमी च्या अनेक नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची म्हणून यापूर्वीच तयारी केली असून स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे.

नगराध्यक्ष पद वगळता ११ प्रभागामधून २२ नगरसेवक निवडले जाणार आहेत. मात्र भाजपकडे केवळ नगराध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. तर नगरसेवक पदासाठी एका एका प्रभागातून दहा ते बारा जण इच्छुक आहेत. यामध्ये अनेकजण यापूर्वी निवडून आले आहेत त्यांनीही पुन्हा तयारी केली आहे. काहींनी आपल्याला उमेदवारी नाही मिळाल्यास महिलांच्या प्रभागात पत्नी, बहिण, चुलती, आई यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. तर सर्वसाधारण जागेवर स्वतःसह भाऊ, पुतण्या वेळप्रसंगी एखाद्याच्या वडिलांचेही नाव पुढे येवू शकते अशी तयारी ठेवली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या नावांची  अधिकृत घोषणा करताना संजय जगताप तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पुरंदरचा विमानतळ प्रकल्प रद्द करावा; प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

काही उमेदवार भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तर उमेदवारीसाठी शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीशी यापूर्वीच युती केली असून सासवड नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी आमदार विजय शिवतारे कोणतीही संधी सोडणार नाहीत त्यामुळे निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांसाठी शिवतारे यांनी आपले दरवाजे आधीपासूनच खुले ठेवले आहेत. त्यामुळे आता उमेदवारी मिळण्याची खात्री नसलेले किती उमेदवारी शिवतारेंच्या जाळ्यात अडकणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Sadwas nagar parishad sanjay jagtap bjp local body election 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • BJP
  • MLA Sanjay Jagtap
  • Saswad

संबंधित बातम्या

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
1

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
2

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात
3

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात

होय, मी कट्टर भाजप समर्थक, महेश कोठारे यांच्या विधानांनंतर निवेदिता सराफांचे वक्तव्य चर्चेत!
4

होय, मी कट्टर भाजप समर्थक, महेश कोठारे यांच्या विधानांनंतर निवेदिता सराफांचे वक्तव्य चर्चेत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.