Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: मोठी बातमी! संचेती हॉस्पिटलजवळील पूल पाडला जाणार; पण नेमके कारण काय?

नव्या मार्गिकेवर काही ठिकाणी आणखी पूल येणार असल्याचे एमआरव्हीसी च्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.  राज्य सरकारने या मार्गाला मंजुरी दिल्याने लवकरच याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 09, 2025 | 02:35 AM
Pune News: मोठी बातमी! संचेती हॉस्पिटलजवळील पूल पाडला जाणार; पण नेमके कारण काय?
Follow Us
Close
Follow Us:
पुणे-लोणावळा दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी
एमयुटीपी अंतर्गत हा प्रकल्प होणार
संचेतीकडून संगमवाडीला जाणारा पूल पाडावा लागणार

पुणे: राज्य सरकारने पुणे-लोणावळा दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी दिल्यानंतर आता एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) कडून हालचालींना वेग आला आहे. एमयुटीपी अंतर्गत हा प्रकल्प होणार आहे. याचे काम ‘एमआरव्हीसी’ करणार आहे. पहिल्या टप्यात चिंचवड ते लोणावळा दरम्यान अतिरिक्त मार्गिकेचे काम केले जाईल. तर दुसऱ्या, चिंचवड ते (पुणे) या टप्प्यात संचेती हॉस्पिटलजवळील  संचेतीकडून संगमवाडीला जाणारा पूल पाडावा लागणार असल्याचे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संचेती पुलाच्या खालून सध्या (रेल्वेच्या) दोन मार्गिका आहेत. मार्गिका वाढविण्यासाठी पुलामुळे जागा कमी पडते. परिणामी ‘एमआरव्हीसी ‘ ने पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात लवकरच पुणे महापालिकेशी पत्र व्यवहार केला जाणार आहे. नव्या मार्गिकेवर काही ठिकाणी आणखी पूल येणार असल्याचे एमआरव्हीसी च्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.  राज्य सरकारने या मार्गाला मंजुरी दिल्याने लवकरच याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे आणि लोणावळा दरम्यानच्या प्रवासाला मोठी गती मिळणार आहे.या प्रकल्पासाठी सुमारे ५,१०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारकडून जीआर आल्यानंतर, मुंबई रेल्वे विकास महामंडळ हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करेल. या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे.

Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन

पहिल्या टप्प्यात चिंचवड ते लोणावळा दरम्यान काम
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात चिंचवड ते लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिका टाकल्या जातील. सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते, त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नवीन मार्गिकांमुळे ही समस्या दूर होईल आणि लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना वेगवान प्रवासाचा अनुभव मिळेल.
पुणेकरांना दिलासा! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘या’ बहुचर्चित उड्डाणपुलाचे लोकार्पण, वाहतूक कोंडीतून…

दुसऱ्या टप्प्यात संचेती पूल पाडून नवा पूल उभारणार

प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात संचेतीजवळील जुना पूल पाडण्यात येईल. हा पूल संचेतीहून संगमवाडीकडे जाणाऱ्या रोड ओव्हर ब्रिजचा एक भाग आहे. हा पूल पाडून त्याजागी नवीन आणि अधिक आधुनिक पूल बांधला जाईल. या बदलांमुळे वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल.हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे आणि लोणावळा दरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी होईल,

Web Title: Sancheti bridge will be demolished for new pune lonavala railway route

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Bridge
  • Indian Railway
  • pune news

संबंधित बातम्या

परवानगीशिवाय रस्ता खोदणे पडलं महागात; तब्बल 80 लाखांचा ठोठावला दंड
1

परवानगीशिवाय रस्ता खोदणे पडलं महागात; तब्बल 80 लाखांचा ठोठावला दंड

पिंपरी-चिंचवडमधील सर्व पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट; महापालिकेची मोठी मोहीम
2

पिंपरी-चिंचवडमधील सर्व पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट; महापालिकेची मोठी मोहीम

दिवाळीत पुण्यात कचऱ्याचा अक्षरश: ढिग; दररोज 200 टनांपर्यंत वाढ…
3

दिवाळीत पुण्यात कचऱ्याचा अक्षरश: ढिग; दररोज 200 टनांपर्यंत वाढ…

Mohol Vs Dhangekar”… नाहीतर मंत्रिपद वाचवा”; मोहोळांनी जैनमुनींची भेट घेताच धंगेकरांचा नवीन बॉम्ब
4

Mohol Vs Dhangekar”… नाहीतर मंत्रिपद वाचवा”; मोहोळांनी जैनमुनींची भेट घेताच धंगेकरांचा नवीन बॉम्ब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.