मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे लोकार्पण (फोटो- ट्विटर)
पुण्यातील नागरिकांना मिळणार वाहतूक कोंडीमधून दिलासा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे लोकार्पण
अनेक दिवसांपासून रखडले होते उद्घाटन
पुणे/Pune News: पुणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले आहे. त्यामुळे नगरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सिंहगड रस्त्यावरील बहुचर्चित असलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या उड्डाणपूलामुळे सिंहगड रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
🔸Inauguration of the flyover from Swaminishtha Shivrakshak Veer Shivaji Kashid Chowk to Vinodmurti Late Prakash Vitthal Inamdar Chowk, at the hands of CM Devendra Fadnavis.
Union MoS Murlidhar Mohol, Deputy Chairperson of the Legislative Council Dr Neelam Gorhe, MoS Madhuri… pic.twitter.com/Qlcu9MvHM7— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 1, 2025
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल आजपासून पुणेकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. यामुळे सिंहगड रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवा काशीद चौक ते हिंगणे या दरम्यान हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन पार पडल्यावर आजपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन देखील वाहतुकीसाठी सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. त्या ठिकाणी उड्डाणपूल खुला व्हावा यासाठी अनेकांनी आंदोलन देखील केले होते. मात्र आजपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
सिंहगड रस्त्यावर नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. उड्डाणपुलाच्या लोकार्पणाची तारीख पुढे ढककली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुर असल्याचे पाहायला मिळत होते. एका बाजूच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण आधीच झाले होते. आता दोन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले झाले असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर त्यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक एकात्मिक दुमजली उड्डाणपूल (औंध ते शिवाजीनगर) प्रकल्प
पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसेच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दिर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून यासाठी अंदाजित २७७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त आहे. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच अस्तित्वातील वाहतुकीस पुरेसा रस्ता उपलब्ध व्हावा, म्हणून या दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.