Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खडकी लष्करी तळावर ‘सांझा शक्ती’ संयुक्त सराव; आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाचा यशस्वी प्रयोग

सरावादरम्यान विविध आपत्कालीन परिस्थितींचे प्रत्यक्ष अनुकरण करण्यात आले. यामध्ये संवाद व्यवस्था, मानक कार्यपद्धती आणि निर्णय प्रक्रिया यांची चाचणी घेण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 11, 2026 | 02:35 AM
खडकी लष्करी तळावर ‘सांझा शक्ती’ संयुक्त सराव; आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाचा यशस्वी प्रयोग
Follow Us
Close
Follow Us:

यशस्वीपणे पार पडला ‘शक्ती’ हा लष्करी-नागरी संयुक्त सराव
संयुक्त सरावात १६ नागरी संस्थांनी घेतला सहभाग
लष्करी जवानांसह ३५० हून अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी

पुणे: दक्षिणी कमांडच्या एमजी अँड जी एरियाच्या नेतृत्वाखाली खडकी लष्करी तळावरील डिग्गी रेंज येथे ८ व ९ जानेवारी रोजी ‘सांझा शक्ती’ हा लष्करी-नागरी संयुक्त सराव यशस्वीपणे पार पडला. या सरावातून आपत्कालीन आणि सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी लष्करी व नागरी यंत्रणांमधील समन्वय आणि जलद प्रतिसाद क्षमतेचा प्रभावी अनुभव घेण्यात आला.

या सरावात भारतीय लष्करासह महाराष्ट्र पोलीस, फोर्स वन, अग्निशमन दल यांसह एकूण १६ नागरी संस्थांनी सहभाग घेतला. लष्करी जवानांसह ३५० हून अधिक अधिकारी व कर्मचारी या सरावात सहभागी झाले होते. बदलत्या सुरक्षा परिस्थितीत एकमेकांशी समन्वय साधणे, वेळेत निर्णय घेणे आणि एकत्रितपणे कार्य करणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.

सरावादरम्यान विविध आपत्कालीन परिस्थितींचे प्रत्यक्ष अनुकरण करण्यात आले. यामध्ये संवाद व्यवस्था, मानक कार्यपद्धती आणि निर्णय प्रक्रिया यांची चाचणी घेण्यात आली. संकटाच्या वेळी सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी आणि प्रभावी व्यवस्थापनासाठी अशा संयुक्त सरावांची गरज असल्याचे सहभागी संस्थांनी नमूद केले. या प्रसंगी लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह, जनरल ऑफिसर कमांडिंग, एमजी अँड जी एरिया यांनी नैसर्गिक आपत्ती, विशेषतः पूरपरिस्थितीत भारतीय लष्कराने बजावलेल्या मदतकार्याची माहिती दिली. तसेच माजी सैनिक व वीर नारींसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचाही त्यांनी उल्लेख केला.

देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी, आपत्तीच्या वेळी नागरिकांना तातडीची मदत पोहोचवण्यासाठी तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना सहाय्य देण्यासाठी लष्कर आणि नागरी यंत्रणांमध्ये मजबूत समन्वय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सांझा शक्ती’सारख्या संयुक्त सरावांमुळे लष्करी-नागरी यंत्रणांची तयारी अधिक भक्कम होत असून, भविष्यातील आपत्कालीन आणि सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढत असल्याचे या सरावातून स्पष्ट झाले.

Web Title: Sanjha shakti joint exercise at khadki military base pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Fire Brigade
  • indian army
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News : पुणेकरांचा नाद नाही! लाडक्या बहिणींच्या पैशांचा उल्लेख करत मागितले मत; थेट केली आमदारांविरोधात तक्रार
1

Pune News : पुणेकरांचा नाद नाही! लाडक्या बहिणींच्या पैशांचा उल्लेख करत मागितले मत; थेट केली आमदारांविरोधात तक्रार

Pune Election : ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा; 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर
2

Pune Election : ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा; 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर

Pune Election : अमोल बालवडकरांचे तिकीट का कापले? चंद्रकांत पाटील यांनी केला खुलासा
3

Pune Election : अमोल बालवडकरांचे तिकीट का कापले? चंद्रकांत पाटील यांनी केला खुलासा

Pune Politics : “…म्हणून अजितदादांनी आंदेकरांच्या घरात पुन्हा दिली उमेदवारी; आंदेकरांच्या मुलींनी मांडल्या भावना
4

Pune Politics : “…म्हणून अजितदादांनी आंदेकरांच्या घरात पुन्हा दिली उमेदवारी; आंदेकरांच्या मुलींनी मांडल्या भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.