राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली आहे. गांधी यांनी जे बदनामीकारक वक्तव्य केले होते ते भाषण युट्यूबवर दिसून येत आहे.
पुणे पोलिसांनी त्या संदर्भात अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट कंपनीला समन्स पाठवून तसा तांत्रिक तपास केला होता. परंतु तो तांत्रिक तपासाचा अहवाल अद्याप न्यायालयात दाखल नाही. तो अहवाल विश्रामबाग पोलिसांकडून मागवावा. तसेच राहुल गांधी यांना या न्यायालयाने आदेश द्यावेत, की तो भाषणाचा व्हीडिओ युट्यूबवरून डिलीट करू नये किंवा काढून टाकू नये, असा अर्ज केला आहे.
राहुल गांधींच्या ‘जीवाला धोका’ नक्की कोणापासून?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलाने पुण्यातील न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर काही तासांतच यू-टर्न घेतला आणि म्हटले की त्यांनी राहुल गांधींना न विचारता अर्ज दाखल केला आहे. वकिलाच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी अर्जाशी तीव्र असहमती व्यक्त केली आहे. त्यामुळे ते गुरुवारी न्यायालयात सादर केलेला अर्ज मागे घेतील.
राहुल गांधींच्या ‘जीवाला धोका’ नक्की कोणापासून? कोर्टात केलेल्या दाव्याला नवे वळण, वकिलांचा अर्ज
सात्यकी सावरकर यांनी २०२३ मध्ये लंडन भेटीदरम्यानच्या त्यांच्या एका भाषणाचा संदर्भ देऊन राहुल गांधींविरुद्ध हा मानहानीचा खटला दाखल केला आहे. सात्यकीच्या मते, या भाषणात राहुल गांधींनी विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखनातील एका घटनेचा उल्लेख केला होता, ज्यामध्ये सावरकर आणि इतरांनी कथितपणे म्हटले होते की त्यांना मुस्लिम माणसावर हल्ला करण्यात आनंद वाटतो.