सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एसपीपीयू बजेट 2026 सादर झाले (फोटो - सोशल मीडिया)
SPPU Budget 2026 : सोनाजी गाढवे : पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठांमध्ये (Savitribai Phule Pune University) २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एकूण ६१९ कोटी रुपये जमिनीचा आणि ६२४ कोटी खर्चासह विद्यापीठ कल्याणकारी आणि अन्य बी साठी ७८ कोटी रुपयांचा खर्च असणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हे बजेट सभेसमोर व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य नितीन घोरपडे यांनी सादर केले. (Pune News) अर्थसंकल्पात साधारणता ८३ कोटी रुपयांची तूट दर्शवण्यात आली आहे. यंदा विद्यापीठाने संशोधन संवर्धन योजना, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अद्यावत यंत्रणा आणि माहिती तंत्रज्ञानातील पायाभूत सुविधांसह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता आणि विद्यार्थी विकासासाठी कामे केली आहेत.
गेल्या काही वर्षांपासून तुटीचा कल कायम असून, यंदाही तोच ट्रेंड कायम राहिल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. वेतन व निवृत्तीवेतन खर्चातील वाढ, प्रशासकीय खर्चाचा ताण आणि विविध विकास योजनांवरील खर्च यामुळे आर्थिक भार वाढत असल्याचे दिसून येते. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पन्न वाढ मर्यादित राहिली आहे. अर्थसंकल्पातील नियमित खर्चामध्ये वेतन, निवृत्तीवेतन, परीक्षा आणि मूल्यमापन आणि प्रशासकीय खर्च यांचा मोठा वाटा आहे. याशिवाय शैक्षणिक विभागांचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात संशोधन आणि नवोपक्रमावर विशेष भर देण्यात आला आहे. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रिसर्च फंड, संशोधन संवर्धन योजना, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस आणि आंतरराष्ट्रीय अतिथी प्राध्यापक योजना यांसाठी निधी देण्यात आला आहे. पायाभूत सुविधांसाठी माहिती तंत्रज्ञान सुविधा, स्मार्ट कॅम्पस, सीसीटीव्ही देखरेख व्यवस्था आणि विभागांचे आधुनिकीकरण यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : तुमचे विचार पुढील मार्ग उजळवणारे ‘दीप’ आहेत; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण पोस्ट
विद्यार्थी कल्याणासाठी सुरक्षा विमा, कौशल्य विकास, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम, तसेच समर्थ भारत अभियान यांसाठीही निधी राखीव ठेवण्यात आला आहे. एकूणच, तुलनेने कमी तुटीसह सादर झालेला हा अर्थसंकल्प आर्थिक संतुलन राखण्याचा प्रयत्न दर्शवत आहे. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या कुलसचिव चारुशीला गायके म्हणाल्या की, “अर्थसंकल्पामध्ये प्रथमच निधी आधारित पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे ८३ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.” असे त्या म्हणाल्या आहेत.
खर्चाचे प्रमुख घटक
योजना व तरतूद (कोटी रुपये) नवीन तरतूद
| वर्ष | जमा (कोटी) | खर्च (कोटी) | तूट(कोटी) |
|---|---|---|---|
| 2021-22 | 577 | 606 | 29 |
| 2022-23 | 481 | 550 | 69 |
| 2023-24 | 549 | 617 | 68 |
| 2024-25 | 528 | 627 | 99 |
| 2025-26 | 566 | 648 | 82 |
| 2026-27 | 619 | 623 | 83 |






