Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SPPU Budget 2026 : पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर; यंदाही 83 कोटींची तुटी, विद्यार्थ्यांना काय मिळाले?

SPPU Budget 2026 : सावित्रीबाई फुले विद्यापीठांमध्ये २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एकूण ६१९ कोटी रुपये जमिनीचा आणि ६२४ कोटी खर्चासह अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 29, 2026 | 11:34 AM
पुणे विद्यापीठातही FDA चा दणका; कॅन्टीनचा अन्न परवानाच निलंबित, अन्नसुरक्षेतील आढळल्या गंभीर त्रुटी

पुणे विद्यापीठातही FDA चा दणका; कॅन्टीनचा अन्न परवानाच निलंबित, अन्नसुरक्षेतील आढळल्या गंभीर त्रुटी

Follow Us
Follow Us:

SPPU Budget 2026 : सोनाजी गाढवे : पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठांमध्ये (Savitribai Phule Pune University) २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एकूण ६१९ कोटी रुपये जमिनीचा आणि ६२४ कोटी खर्चासह विद्यापीठ कल्याणकारी आणि अन्य बी साठी ७८ कोटी रुपयांचा खर्च असणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हे बजेट सभेसमोर व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य नितीन घोरपडे यांनी सादर केले. (Pune News) अर्थसंकल्पात साधारणता ८३ कोटी रुपयांची तूट दर्शवण्यात आली आहे. यंदा विद्यापीठाने संशोधन संवर्धन योजना, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अद्यावत यंत्रणा आणि माहिती तंत्रज्ञानातील पायाभूत सुविधांसह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता आणि विद्यार्थी विकासासाठी कामे केली आहेत.

 

गेल्या काही वर्षांपासून तुटीचा कल कायम असून, यंदाही तोच ट्रेंड कायम राहिल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. वेतन व निवृत्तीवेतन खर्चातील वाढ, प्रशासकीय खर्चाचा ताण आणि विविध विकास योजनांवरील खर्च यामुळे आर्थिक भार वाढत असल्याचे दिसून येते. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पन्न वाढ मर्यादित राहिली आहे. अर्थसंकल्पातील नियमित खर्चामध्ये वेतन, निवृत्तीवेतन, परीक्षा आणि मूल्यमापन आणि प्रशासकीय खर्च यांचा मोठा वाटा आहे. याशिवाय शैक्षणिक विभागांचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात संशोधन आणि नवोपक्रमावर विशेष भर देण्यात आला आहे. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रिसर्च फंड, संशोधन संवर्धन योजना, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस आणि आंतरराष्ट्रीय अतिथी प्राध्यापक योजना यांसाठी निधी देण्यात आला आहे. पायाभूत सुविधांसाठी माहिती तंत्रज्ञान सुविधा, स्मार्ट कॅम्पस, सीसीटीव्ही देखरेख व्यवस्था आणि विभागांचे आधुनिकीकरण यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : तुमचे विचार पुढील मार्ग उजळवणारे ‘दीप’ आहेत; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण पोस्ट

विद्यार्थी कल्याणासाठी सुरक्षा विमा, कौशल्य विकास, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम, तसेच समर्थ भारत अभियान यांसाठीही निधी राखीव ठेवण्यात आला आहे. एकूणच, तुलनेने कमी तुटीसह सादर झालेला हा अर्थसंकल्प आर्थिक संतुलन राखण्याचा प्रयत्न दर्शवत आहे. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या कुलसचिव चारुशीला गायके म्हणाल्या की, “अर्थसंकल्पामध्ये प्रथमच निधी आधारित पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे ८३ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.” असे त्या म्हणाल्या आहेत.

खर्चाचे प्रमुख घटक

  • वेतन व निवृत्तीवेतन खर्च
  • परीक्षा व मूल्यमापन
  • प्रशासकीय खर्च
  • शैक्षणिक विभागांचा खर्च
हे देखील वाचा : अखेर रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

योजना व तरतूद (कोटी रुपये) नवीन तरतूद

  • UDRF (संशोधन निधी) – १ कोटी ५० लाख
  • संशोधन संवर्धन योजना – २ कोटी
  • प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस – ५२ लाख
  • आंतरराष्ट्रीय अतिथी प्राध्यापक – ५० लाख
  • आयटी / स्मार्ट कॅम्पस – १ कोटी
  • सीसीटीव्ही सुरक्षा – १० कोटी
  • विभागांचे आधुनिकीकरण – १५
  • विद्यार्थी सुरक्षा विमा – ३
  • राष्ट्रीय सेमिनार -९२ लाख
  • परिसस्पर्श योजना -५० लाख
  • नवउधोजक योजना – ५० लाख
यंदाच्या वर्षी देण्यात आलेले प्राध्यान्य
  • संशोधन व नवोपक्रम
  • पायाभूत सुविधा
  • विद्यार्थी कल्याण
  • तंत्रज्ञानाधारित कॅम्पस
  • सीसीटीव्ही प्रकल्प
शिष्यवृत्तीचे नावे – प्रस्तावित तरतूद
  • लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अर्थसाह्य योजना – १कोटी २५ लाख
  • महात्मा जोतिराव फुले अर्थसहाय्य योजना – १ कोटी ३० लाख
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज अर्थसहाय योजना – २ कोटी ३० लाख
  • स्वामी विवेकानंद अर्थसाह्य योजना – २ कोटी २५ लाख
  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसाह्य योजना – १ कोटी
  • छत्रपती शिवाजी महाराज अर्थसाह्य योजना – कोटी
संशोधन व गुणवत्तेसाठी
  1. गुणवत्ता सुधार कार्यक्रम – १३ कोटी
  2. संशोधन योजना ७ कोटी
संशोधनासाठी
  1. संशोधन योजना ६.५० कोटी
  2. शैक्षणिक संशोधन समन्वय योजना – २५ लाख
  3. शिक्षक व शिक्षकतरसाठी प्रकाशनासाठी अनुदान – ५ लाख
  4. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषद प्रवास खर्च – २० लाख
गेल्या पाच वर्षाचा अर्थसंकल्प

 

वर्ष जमा (कोटी) खर्च (कोटी) तूट(कोटी)
2021-22 577 606 29
2022-23 481 550 69
2023-24 549 617 68
2024-25 528 627 99
2025-26 566 648 82
2026-27 619 623 83

Web Title: Savitribai phule pune university sppu budget 2026 pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • pune news
  • Pune University
  • Savitribai Phule Pune University

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.