
बारामती: “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला? आपण. निवडणूक चिन्ह कुणाचं? आपलं. पण एक दिवस काही लोकांनी थेट आमच्यावर खटला दाखल केला. मी माझ्या आयुष्यात कधीच न्यायालया समोर उभा राहिलो नव्हतो. या लोकांनी आमच्यावर खटला दाखल करून आम्हाला न्यायालयासमोर उभं केलं. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे मालक आम्हीच आहोत, निवडणूक चिन्हही त्यांचं नाही तर आमचं आहे. केंद्र सरकारनेही आमचा पक्ष त्या गटाला दिला. मात्र जनता आमच्याबरोबरच आहे”. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील फूटीवर भाष्य केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून आज जवळपास दीड वर्ष लोटलं. आजपर्यंत अनेकदा दोन्ही गटाकडून एकमेकांवर सातत्याने आरोप प्रत्यारोप होत असतात. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून तर थेट शरद पवारांवर टीका होत असते. पण शरद पवार मात्र प्रत्येकवेळी त्यांच्या टीकेला उत्तर देत नाहीत. पण आज बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्यासाठी प्रचारसभा घेण्यात आली. या सभेत शरद पवार यांनी अजित पवारांच्या टीकांना उत्तर देत आजवर झालेल्या घटनांवर भाष्य केलं. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयात काय काय घडलं तेही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा: “मी अपक्ष निवडणूक लढवणार…”, नवाब मलिकांकडून दोन अर्ज दाखल
शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. या प्रकरणात अनेकदा सुनावण्या झाल्या ज्यांनी खटला दाखल केला होता. त्यात प्रमुख आरोपी म्हणून माझं नावं दिलं होतं. या प्रकरणात माझ्यावर खटला दाखल करण्यात आला होता. मला न्यायालयाचे समन्स पाठवण्यात आलं. समन्सवर शरद गोविंदराव पवार असं नाव होतं.”
“सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगाचंही समन्स आलं होतं. समन्स आल्यावर मी पहिल्यांदाच न्यायालयासमोर हजर झालो. समन्स आलं असेल तर आपल्याला त्यांच्यासमोर चौकशीसाठी हजर राहावचं लागतं. मी न्यायालयात गेलो. न्यायमूर्तींसमोर उभा राहिलो. दिवस-दिवसभर खटला चालायचां. त्यांनी मला दिवस दिवसभर तिथं उभ करण्याचं काम केलं. मी न्यायालयासमोर उभा राहिलो. तक्रार माझ्याविरोधात कुणाची होती तर चिरंजिवांची होती. मग न्यायालयाने पाहिलं दोन्ही बाजूची नावं सारखीच आहेत. दोघेही पवारच आहेत.” असंही शरद पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा: सिंहगड किल्ल्याजवळ आढळला मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु
“माझ्या आयुष्यात कधीच असं घडलं नव्हतं. पण त्यांनी तो खटला दाखल करून मला न्यायालयात खेचलं. महाराष्ट्रातलं सरकार तर त्यांच्याच हातात होतं. त्यात केंद्र सरकारनेही काय चक्रे फिरवली ते माहिती नाही. न्यायालयाने पक्ष आणि पक्ष चिन्ह त्या दुसऱ्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांचा त्याच्याशी काही संबंध नाही. त्यामुळए आपल्याला नवं चिन्हं घ्यावं लागलं. पक्षाचं नाव बदलावं लागलं. त्यांनी आपला पक्ष आणि पक्षाचा चिन्हही बळकावलं. ते एवढ्यावरचं थांबले नाहीत. त्यांचा अजूनही त्रास देणं सुरूच आहे. पण आपणही हार मानली नाही.