Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Jayanti 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला; शिवप्रेमींची बाजारपेठेत गर्दी

पिंपरी-चिंचवड शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 17, 2026 | 06:05 PM
शिवजयंतीनिमित्त सांगलीत उद्या मेगा पदयात्रा

शिवजयंतीनिमित्त सांगलीत उद्या मेगा पदयात्रा

Follow Us
Close
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवडमध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला
  • शिवप्रेमींची बाजारपेठेत गर्दी
  • ‘शिवगर्जना’ महानाट्याचे विशेष आकर्षण
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आनंदाचे आणि ऐतिहासिक अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण शहर भगवेमय झाले असून, प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये सजावटीची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे.

 

बाजारपेठांमध्ये शिवरायांच्या प्रतिमांची धूम

पिंपरी आणि चिंचवडमधील मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध आकारांतील आकर्षक मूर्ती, प्रतिमा आणि भगवे झेंडे यांनी दुकाने सजली आहेत. विशेषतः बालशिवाजी, राजमाता जिजाऊ आणि मावळ्यांच्या ऐतिहासिक वेशभूषेला मोठी मागणी असून, ड्रेपरी दुकाने ग्राहकांनी गजबजली आहेत.

पारंपरिक वेशभूषेवर भर

शोभायात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांमध्ये नऊवारी साड्या आणि पारंपरिक दागिन्यांची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. पुरुषांकडून मोत्यांच्या माळा, भगवे फेटे, उपरणे आणि मेघडंबरी असलेल्या साहित्याची जोरात खरेदी सुरू आहे.

ढोल-ताशांच्या गजरात होणार मानवंदना

शहरातील विविध सामाजिक मंडळे, संस्था आणि शाळा-महाविद्यालयांच्या वतीने भव्य शोभायात्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सराव: ढोल-ताशा आणि झांज पथकांचा सराव शहरातील विविध भागात जोमाने सुरू आहे.

विद्युत रोषणाई:

एच.ए. कॉलनी आणि निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्प समूह परिसरातील शिवरायांच्या पुतळ्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, या ठिकाणी पथकांकडून मानवंदना दिली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा : काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

‘शिवगर्जना’ महानाट्याचे भव्य आयोजन

यंदा महापालिकेतर्फे निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसरात ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे सादरीकरण होणार आहे. सुमारे २५० हून अधिक कलाकार, घोडे, उंट आणि नेत्रदीपक आतषबाजीच्या माध्यमातून शिवचरित्रातील सुवर्णक्षण जिवंत केले जाणार आहेत. अत्याधुनिक प्रकाशयोजना आणि ध्वनिसंयोजन हे या महानाट्याचे मुख्य आकर्षण ठरेल.

शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रीमंडळातील मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार (दि.१९) रोजी किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा पार पडणार आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विभागातर्फे मंगळवार दिनांक १७ ते गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य” महोत्सव’ आयोजित केले आहे. यानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पर्यटन विभागाचे उपसंचालक भरत लांघी उपस्थित होते.

Web Title: Shiva devotees throng the market to shop on the occasion of shiv jayanti in pimpri chinchwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! पवना धरणात जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा
1

पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! पवना धरणात जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा

पवना बंद पाईपलाईन प्रकल्पाला गती द्या; राहुल कलाटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
2

पवना बंद पाईपलाईन प्रकल्पाला गती द्या; राहुल कलाटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भामा- आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘अल्टिमेटम’; भाजपा आमदार महेश लांडगे यांची महत्त्वपूर्ण बैठक
3

भामा- आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘अल्टिमेटम’; भाजपा आमदार महेश लांडगे यांची महत्त्वपूर्ण बैठक

PCMC News: पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा! महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; पावसाळी समस्यांवर त्रिसूत्री नियोजनाचे आदेश
4

PCMC News: पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा! महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; पावसाळी समस्यांवर त्रिसूत्री नियोजनाचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.