Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवडकरांची प्रतीक्षा संपणार! मार्चपासून भामा-आसखेडचे 167 एमएलडी पाणी मिळणार

मागील सात वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा आणि १६ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या दहा टक्के पाणी कपातीचा सामना करणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांना नव्या वर्षात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 17, 2026 | 05:30 PM
पिंपरी-चिंचवडकरांची प्रतीक्षा संपणार! मार्चपासून भामा-आसखेडचे 167 एमएलडी पाणी मिळणार

पिंपरी-चिंचवडकरांची प्रतीक्षा संपणार! मार्चपासून भामा-आसखेडचे 167 एमएलडी पाणी मिळणार

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवडकरांची प्रतीक्षा संपणार
  • मार्चपासून १६७ एमएलडी अतिरिक्त पाणी
  • १० टक्के पाणीकपातीचा ताण कमी होणार
पिंपरी : मागील सात वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा आणि १६ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या दहा टक्के पाणी कपातीचा सामना करणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांना नव्या वर्षात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भामा आसखेड धरणातून शहराला अतिरिक्त १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी मार्च २०२७ मध्ये उपलब्ध होणार आहे. या योजनेचे काम जानेवारीअखेर पूर्ण करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये पाण्याची चाचणी घेऊन मार्चपासून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.

 

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, त्याचबरोबर पाण्याची मागणीही वाढत आहे. मात्र, उपलब्ध पाणीसाठा आणि वाढती मागणी यांचा ताळमेळ घालताना महापालिका प्रशासनाची दमछाक होत आहे. शहरातील अनेक भागांत अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा आणि त्यातच दहा टक्के कपात यामुळे नागरिकांच्या अडचणींत भर पडली आहे.

या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून मिळणाऱ्या अतिरिक्त पाण्याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. या योजनेअंतर्गत बंदिस्त जलवाहिनीद्वारे १६७ एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येणार आहे. हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर शहराच्या एकूण पाणीपुरवठ्यात वाढ होऊन सध्याच्या व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

सध्या दहा टक्के पाणी कपातीनंतर शहराला पवना धरणातून ५२० एमएलडी, आंद्रा धरणातून ९० एमएलडी आणि एमआयडीसीकडून २५ एमएलडी असे एकूण ६३५ एमएलडी पाणी मिळत आहे. त्यात भामा आसखेडचे १६७ एमएलडी पाणी उपलब्ध झाल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा : दुबईतून भारतात ऑनलाइन फसवणुकीचा मोठा कट; 10 ते 12 हजार सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नवीन ठेकेदाराची नियुक्ती

दरम्यान, भामा आसखेड पाणी योजनेचे काम रखडल्याने नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून, त्यानंतर कामाला वेग आला आहे. कामाचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. जानेवारी २०२७ अखेरपर्यंत काम पूर्ण करून फेब्रुवारीमध्ये पाण्याची चाचणी घेण्यात येईल. मार्चमध्ये शहराला प्रत्यक्ष वाढीव १६७ एमएलडी पाणी उपलब्ध होईल, असे महापालिकेचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा  : रोहित पठारे हत्याकांडावरून काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांकडे ‘ही’ मोठी मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: पिंपरी-चिंचवडला भामा आसखेड धरणातून किती अतिरिक्त पाणी मिळणार आहे?

    Ans: भामा आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) अतिरिक्त पाणी मिळणार आहे.

  • Que: भामा आसखेडचे अतिरिक्त पाणी शहराला कधीपासून मिळणार आहे?

    Ans: योजनेचे काम जानेवारी २०२७ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. फेब्रुवारीमध्ये पाण्याची चाचणी घेतल्यानंतर मार्च २०२७ पासून प्रत्यक्ष १६७ एमएलडी पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे.

  • Que: सध्या पिंपरी-चिंचवडला किती पाणीपुरवठा होत आहे?

    Ans: दहा टक्के पाणी कपातीनंतर शहराला पवना धरणातून ५२० एमएलडी, आंद्रा धरणातून ९० एमएलडी आणि एमआयडीसीकडून २५ एमएलडी, असे एकूण ६३५ एमएलडी पाणी मिळत आहे.

Web Title: Citizens of pimpri chinchwad will soon receive water from bhama askhed nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pimpri Chinchwad
  • water news

संबंधित बातम्या

Bhandara News: कुपोषणाचे आव्हान अद्यापही कायम! १०४ बालके अतितीव्र कुपोषित; पवनीत कमी वजनाची बालके सर्वाधिक
1

Bhandara News: कुपोषणाचे आव्हान अद्यापही कायम! १०४ बालके अतितीव्र कुपोषित; पवनीत कमी वजनाची बालके सर्वाधिक

Sangali News: माधवनगर रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी गप्प का? नितीन शिंदेंचा सवाल
2

Sangali News: माधवनगर रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी गप्प का? नितीन शिंदेंचा सवाल

Shivshahi Housing Project: काय सांगता! अवघ्या १९ लाखांत मिळणार घर; कुठे आणि कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती
3

Shivshahi Housing Project: काय सांगता! अवघ्या १९ लाखांत मिळणार घर; कुठे आणि कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती

हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात
4

हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.