Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharat Taxi News: भारत टॅक्सी’च्या सारथी बनल्या ३०० महिला; पुण्यात सेवेला वाढता प्रतिसाद; चालकांची संख्या ६० हजारांवर

Bharat Taxi News: खासगी अॅप आधारित कंपन्यांकडून गर्दीच्या वेळेत प्रवाशांना दुप्पट-तिप्पट भाडे आकारले जाते. तसेच चालकांकडून प्रत्येक प्रवासामागे कमिशनही वसूल केले जाते.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 18, 2026 | 04:52 PM
Pune News, Pimpri Chinchwad, Bharat Taxi, Women Empowerment

Pune News, Pimpri Chinchwad, Bharat Taxi, Women Empowerment

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील ३०० हून अधिक महिला चालक प्रवासी
  • पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सारथींची संख्या ३५ हजारांवरून ६० हजारांवर
  • प्रवाशांकडून कोणतेही कमिशन किंवा अतिरिक्त शुल्क न घेण्याच्या धोरणामुळे मोठा प्रतिसाद.
Bharat Taxi News: प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आता महिलाही आपली ओळख निर्माण करत आहेत. खासगी अॅप आधारित कंपन्यांच्या स्पर्धेत उतरलेल्या ‘भारत टॅक्सी’ सेवेशी पुण्यातील ३०० हून अधिक महिला चालक जोडल्या गेल्या आहेत. महिला चालकांच्या या सहभागासह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एकूण सारथींची संख्या ६० हजारांवर पोहोचली आहे. चालकांना कमिशनमुक्त उत्पन्नाची संधी आणि प्रवाशांना पारदर्शक भाडे आकारणी हे या सेवेच्या वाढत्या प्रतिसादाचे प्रमुख कारण ठरत आहे.

खासगी अॅप आधारित कंपन्यांकडून गर्दीच्या वेळेत प्रवाशांना दुप्पट-तिप्पट भाडे आकारले जाते. तसेच चालकांकडून प्रत्येक प्रवासामागे कमिशनही वसूल केले जाते. या पार्श्वभूमीवर ‘भारत टॅक्सी’ने चालकांकडून कोणतेही कमिशन किंवा अतिरिक्त शुल्क न घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या शुल्क पद्धतीला कंटाळलेले चालक या सेवेकडे वळत आहेत. काही दिवसांपूर्वी ३५ हजारांवर असलेली चालकांची संख्या आता ६० हजारांवर पोहोचली आहे.

Satara Politics: आगे आगे देखो, होता है क्या…; सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा इशारा

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड’च्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. देशभरातील खासगी अॅप आधारित कंपन्यांच्या मक्तेदारीला पर्याय उपलब्ध करून देण्याचा यामागील उद्देश आहे. मुंबईतील प्रतिसादानंतर पुण्यातही या सेवेचा विस्तार होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सरकारी दरानुसार प्रवासी सेवा दिली जात आहे. भाडे आकारणीत कोणतेही छुपे शुल्क नसल्याने चालकांसह प्रवाशांचाही प्रतिसाद वाढत असल्याचे भारत टॅक्सीचे शहर प्रमुख मोहित मित्रा यांनी सांगितले.

भारत टॅक्सीचे प्रति किलोमीटर दर :

वाहन प्रकार. दर
रिक्षा. १८ रुपये
हॅचबॅक. २४ रुपये
सिडान. २५ रुपये
एसयूव्ही. ३१ रुपये

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातासंबंधी फुटेज देण्यास मुंबई पोलिसांसह DGCAने नकार का दिला?

ठळक आकडेवारी :

एकूण चालक : ६० हजार
महिला चालक : ३०० हून अधिक
यापूर्वीची चालक संख्या : ३५ हजार

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात किती महिला चालक 'भारत टॅक्सी' सेवेशी जोडल्या गेल्या आहेत?

    Ans: पुण्यातील ३०० हून अधिक महिला चालक 'भारत टॅक्सी' सेवेशी जोडल्या गेल्या असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एकूण चालकांची संख्या ६० हजारांवर पोहोचली आहे.

  • Que: 'भारत टॅक्सी' सेवा कोणाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे?

    Ans: केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतील 'सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड'च्या माध्यमातून खासगी ॲप आधारित कंपन्यांच्या मक्तेदारीला पर्याय म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

  • Que: चालक आणि प्रवाशांना या सेवेचा नेमका काय फायदा होत आहे?

    Ans: भारत टॅक्सीमध्ये चालकांकडून कोणतेही कमिशन घेतले जात नाही, तर प्रवाशांना गर्दीच्या वेळेत जादा भाड्याचा भुर्दंड न बसता सरकारी दरानुसार पारदर्शक भाडे आकारणीचा लाभ मिळत आहे.

Web Title: Bharat taxi pune women drivers crosses 300 total drivers reach 60000 as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Pimpri Chinchwad
  • pune news

संबंधित बातम्या

दिलासादायक ! पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय तूर्त नाहीच; फक्त गुरुवारी पुरवठा बंद
1

दिलासादायक ! पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय तूर्त नाहीच; फक्त गुरुवारी पुरवठा बंद

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू
2

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू

कंपनीतील 15 कोटींच्या ॲल्युमिनियमवर डल्ला; स्टोअर ऑफिसरसह 10 जणांवर गुन्हा दाखल
3

कंपनीतील 15 कोटींच्या ॲल्युमिनियमवर डल्ला; स्टोअर ऑफिसरसह 10 जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; 20 ते 25 दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान
4

पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; 20 ते 25 दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.