Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर पहिल्याच पावसात जलमय; भीमाशंकरकडे जाणारी वाहतूक बंद

2027 मध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मंदिर परिसरात विविध विकासकामे युद्ध पातळीवर सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 08, 2026 | 12:43 PM
श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर पहिल्याच पावसात जलमय; भीमाशंकरकडे जाणारी वाहतूक बंद

श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर पहिल्याच पावसात जलमय; भीमाशंकरकडे जाणारी वाहतूक बंद

Follow Us
Follow Us:

रांजणी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू मुसळधार पावसाचा फटका आता तेथील नागरिकांना बसत आहे. सोमवारी व मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या पावसानंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. मंदिराच्या चारही बाजूने पाण्याचा वेढा पडल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. नव्याने उभारण्यात आलेल्या सभा मंडपातही पावसाचे पाणी गळू लागल्याने विकासकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

2027 मध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मंदिर परिसरात विविध विकासकामे युद्ध पातळीवर सुरू आहे. सभा मंडप पायरी मार्ग, मंदिर परिसराचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा आणि इतर कामावर गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून काम सुरू आहे. मात्र, या कामामध्ये योग्य नियोजन आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न केल्याने पहिल्याच जोरदार पावसात त्रुटी उघड झाल्या.

Konkan Rain : रत्नागिरीत दरड दुर्घटनांची मालिका सुरूच; दहिवलीत चार घरे ढिगाऱ्याखाली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

गेल्या पाच महिन्यांपासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी 15 जूनपासून काही नियम व अटींवर दर्शनासाठी खुले केले. मात्र, कामे सुरू असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य व राडारोडा आणि मातीचे ढिग तसेच पडून आहे. त्यामुळे पायरी मार्गावर परिसरातील नैसर्गिक जलनिस:रण व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. परिणामी, पावसाचे पाणी बाहेर जाण्याऐवजी मंदिर परिसरातच पाणी गेल्याने अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले.

मंदिरात आलेल्या भाविकांना बसतोय फटका

मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक, निसर्गप्रेमी, स्थानिक नागरिक तसेच व्यावसायिकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसला. पाण्यातून वाट काढत दर्शनासाठी जावे लागत असल्याने अनेक भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पायऱ्यांवर आणि मार्गावर चिखल झाल्याने घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

छतामधूनही पावसाचे पाणी

नुकत्याच उभारण्यात आलेल्या नव्या सभा मंडपाच्या छतामधून पावसाचे पाणी गळत असल्याचे निदर्शनास आले. उद्घाटनापूर्वीच गळती सुरु झाल्याने विकासकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून घाईघाईने काम पूर्ण करण्यावर भर दिल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ व भाविकांकडून केल्या जात आहे.

भीमाशंकरकडे जाणारा मुख्य रस्ताच पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे राजगुरुनगर इथून ज्योतिर्लिंग क्षेत्र भीमाशंकरकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. गुंडाळवाडी इथल्या पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

Web Title: Shri kshetra bhimashankar temple premises inundated during the very first rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • Heavy Rain

संबंधित बातम्या

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर
1

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.