Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kerala Landslide: केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! भीषण भूस्खलनाचा काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर, तर दोघांचा मृत्यू

केरळच्या वायनाडमध्ये २४ तासांत २६५ मिमी झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. टनेल रोड प्रकल्पाच्या मलब्याखाली अनेक जण अडकल्याची भीती असून NDRF कडून बचावकार्य सुरू आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 07, 2026 | 06:04 PM
केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! (Photo Credit- X)

केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचे रौद्ररूप!
  • भीषण भूस्खलनाचा काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर
  • तर दोघांचा मृत्यू
Kerala Landslide News: केरळमधील वायनाड जिल्ह्यात मंगळवारी निसर्गाचा मोठा हाहाकार पाहायला मिळाला. वायनाडमध्ये झालेल्या अत्यंत भीषण भूस्खलनात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, मलब्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मीनाक्षी पुलाजवळ ही दुर्घटना घडली असून, याच परिसरात सध्या ‘अनाक्कोम्पोयिल-मेप्पाडी टनल रोड’चे (बोगदा मार्ग) बांधकाम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूस्खलनाची माहिती मिळताच कल्पेट्टा येथून अग्निशामक दल आणि बचाव यंत्रणांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, मलब्याखाली नेमके किती लोक अडकले आहेत, याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.

२४ तासांत २६५ मिमी पाऊस

वायनाडमधील या डोंगराळ भागात गेल्या २४ तासांपासून ढगफुटीसदृश पाऊस सुरू आहे. अधिकृत माहितीनुसार, या परिसरात तब्बल २६५ मिमी पावसाची नोंद झाली असून, याच अतिवृष्टीमुळे डोंगरकडा कोसळल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे आणि वाढत्या पावसामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपासूनच टनेल साइटवरील बांधकाम तात्पुरते स्थगित केले होते. यामुळे या ठिकाणी मोठी जीवितहानी टळली असल्याचे बोलले जात आहे.

पाहा व्हिडिओ

CCTv footage of Terrifying Moment of #Landslide near Meenakshi Bridge at #Kalladi , where work on a tunnel road project connecting #Malappuram and #Wayanad districts was going on. According to #Kerala CM one died, 7 injured, another 7 missing. https://t.co/o4TlS0E48m pic.twitter.com/tjBjPPuWsw— Surya Reddy (@jsuryareddy) July 7, 2026

Amarnath yatra 2026: तीन दिवसांत 56,000 भाविकांनी घेतले बाबा बर्फानींचे दर्शन; नोंदणी अनिवार्य, प्रशासनाचे स्पष्ट आवाहन

यंत्रणा पोहोचण्यापूर्वीच स्थानिक मदतीला धावले

आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच कणे आणि स्थानिक परिसरातील नागरिकांनी अतुलनीय शौर्य दाखवत तातडीने बचावकार्य सुरू केले. स्थानिकांनी मलब्यातून ३ जणांना सुखरूप बाहेर काढले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वाचवण्यात आलेले नागरिक टनेल रोड प्रकल्पातील कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये राहत होते. मलब्याखाली आणखी काही मजूर किंवा स्थानिक रहिवासी अडकले आहेत का, याचा तपास कसून केला जात आहे. या भूस्खलनाचा फटका परिसरातील निवासी घरे आणि व्यावसायिक होमस्टेलाही बसला असून, कामगारांची अनेक वाहने ढिगाऱ्याखाली दबून चक्काचूर झाली आहेत.

NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

घटनास्थळी बचाव कार्याला गती देण्यासाठी स्थानिक पोलीस, अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. केरळचे मंत्री टी. सिद्दीक आणि वायनाडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळाचा आढावा घेतला असून, ते मदतकार्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. हा अपघात झालेल्या ‘अनाक्कोम्पोयिल-मेप्पाडी टनल रोड’ प्रकल्प हा मलप्पपुरम आणि वायनाड जिल्ह्यांमधील दळणवळण व कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प मानला जातो. गेल्या वर्षापासून या बोगद्याचे काम सुरू झाले होते. या भूस्खलनामुळे चालू प्रकल्पाच्या संरचनेला काही अंतर्गत नुकसान झाले आहे का, याची चौकशी आता तांत्रिक समितीमार्फत केली जाण्याची शक्यता आहे.

ISRO Gaganyaan Mission: भारताच्या ‘गगनयान’ मोहिमेला मोठे यश! इस्रोकडून विशेष ‘SOLVE’ रॉकेटची पहिली यशस्वी चाचणी

Web Title: Natures fury in wayanad kerala a spine chilling video of a massive landslide has surfaced two people have died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Kerala
  • Landslide News
  • Rain News

संबंधित बातम्या

राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…
1

राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
2

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral
3

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…
4

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.