Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का, सरपंच, उपसरपंचांसह सहा सदस्य अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, सरपंच व उपसरपंचांसह एकूण सहा ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 07, 2026 | 05:46 PM
मावळातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का, सरपंच, उपसरपंचांसह सहा सदस्य अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

मावळातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का, सरपंच, उपसरपंचांसह सहा सदस्य अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Follow Us
Follow Us:
  • मावळातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का
  • सरपंच, उपसरपंचांसह सहा सदस्य अपात्र
  • जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा आदेश
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, सरपंच व उपसरपंचांसह एकूण सहा ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १४(अ) अन्वये दाखल करण्यात आलेल्या विवाद अर्जावर सुनावणी झाल्यानंतर २ सप्टेंबर २०२६ रोजी हा आदेश पारित करण्यात आला. या आदेशामुळे भाजे ग्रामपंचायतीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला असून, ग्रामपंचायतीच्या राजकारणात आगामी काळात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सहा जणांविरोधात दाखल झाला होता विवाद अर्ज

भाजे ग्रामपंचायतीचे सदस्य प्रताप धारवड आणि शेखर दळवी यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे विवाद अर्ज दाखल केला होता. या अर्जामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच अमित ओव्हाळ, उपसरपंच कोमल केदारी, तसेच सदस्य सारिका पडमुले, विकास वाल्हेकर, प्रमोद ढगे आणि कविता चौरे यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली होती.

चौकशीसाठी प्रकरण जिल्हा परिषदेकडे वर्ग

दाखल झालेल्या विवाद अर्जाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित प्रकरण जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे वर्ग केले. त्यानंतर जिल्हा परिषदेने हे प्रकरण पुढील चौकशीसाठी पंचायत समिती, वडगाव मावळ यांच्याकडे पाठविले. चौकशीदरम्यान संबंधित कागदपत्रे, उपलब्ध नोंदी तसेच अर्जदारांनी सादर केलेल्या पुराव्यांची तपासणी करण्यात आली. चौकशीमध्ये संबंधित सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी कायद्यानुसार आवश्यक असलेली कार्यवाही निर्धारित मुदतीत केली नसल्याचे निष्कर्ष नोंदविण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

चौकशी अहवाल तसेच अर्जदारांनी सादर केलेली कागदपत्रे आणि उपलब्ध अभिलेखांच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर सर्व संबंधित पक्षांची बाजू ऐकून घेण्यात आली. सुनावणीदरम्यान मांडण्यात आलेले म्हणणे, उपलब्ध कागदपत्रे आणि चौकशी अहवाल यांचा विचार करून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी २ सप्टेंबर रोजी संबंधित सहा जणांना अपात्र ठरविण्याचा आदेश जारी केला. या निर्णयामुळे भाजे ग्रामपंचायतीच्या सत्ताकारणात मोठी उलथापालथ झाली असून, आता ग्रामपंचायतीच्या पुढील राजकीय घडामोडींकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : नागरिकांची गैरसोय करणारा विकास नको; निगडीतील हरित सेतूवरून खासदार बारणेंनी प्रशासनाला सुनावले

Web Title: Six members of the bhaje gram panchayat in maval have been disqualified

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Jitendra Dudi
  • maval news
  • Maval Politics

संबंधित बातम्या

नसरापूरनंतर मावळ हादरलं! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक
1

नसरापूरनंतर मावळ हादरलं! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक

पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
2

पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…
3

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.