Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SNDTच्या १११व्या वर्धापनदिनी महर्षी कर्वे यांना अनोखी आदरांजली; राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

SNDT 111th foundation day: SNDT महिला विद्यापीठाचा १११ वा वर्धापन दिन ५ जुलै रोजी विविध उपक्रमांसह साजरा केला जाणार असून, या निमित्ताने महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते होणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 26, 2026 | 08:10 PM
SNDTच्या १११व्या वर्धापनदिनी महर्षी कर्वे यांना अनोखी आदरांजली; राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
Follow Us
Follow Us:
  • SNDTच्या १११व्या वर्धापनदिन
  • महर्षी कर्वे यांना अनोखी आदरांजली
  • राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
पुणे शहर: भारतातील तसेच पूर्व आशिया खंडातील पहिले महिला विद्यापीठ असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाचा १११ वा वर्धापन दिन ५ जुलै रोजी विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते करण्यात येणार असून, महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या ‘महाकुंभ २.०’ या अभिनव उपक्रमाचे उद्घाटनही याच दिवशी होणार असल्याची माहीती एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्वला चक्रदेव यांनी दिली.

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

या कार्यक्रमाला एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पुणे परिसरात होणार राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या पुणे परिसरात महर्षी कर्वे यांच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थिनी व शिक्षकांना मिळावी, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून हा पुतळा साकारण्यात आला असून, कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

प्रा. उज्वला चक्रदेव म्हणाल्या की, महर्षी कर्वे यांचे वास्तव्य असलेल्या ‘कर्वे कुटीर’ या ऐतिहासिक वास्तूचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. या संग्रहालयात महर्षी आणि बाया कर्वे यांच्या स्त्री शिक्षणासाठीच्या कार्याचा चित्रमय इतिहास, माहितीपट, पुस्तके, वापरातील वस्तू आणि विविध स्मृतिचिन्हांचे जतन करण्यात आले असून, पुढील काळात संग्रहालयाचा अधिक विकास करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.

वर्धापन दिनानिमित्त ‘महाकुंभ २.०’ चे आयोजन

वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘महाकुंभ २.०’ हा महिला उद्योजक, उद्योगतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि गुंतवणूकदार यांना एकत्र आणणारा उपक्रम ठरणार आहे. या व्यासपीठ द्वारे उद्योग संकल्पनेपासून बाजारपेठेपर्यंत मार्गदर्शन, सामाजिक समस्यांवरील संशोधनाला प्रोत्साहन, दिव्यांगांसाठी सहाय्यक तंत्रज्ञान, ग्रामीण कचरा व्यवस्थापन तसेच तळागाळातील प्रश्नांवरील नाविन्यपूर्ण प्रकल्पांना संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. निवडक प्रकल्पांना अनुदान, मार्गदर्शन आणि इन्क्यूबेशन सेंटरमध्ये संधी देण्याचाही उपक्रमात समावेश आहे. असे कुलगुरू यांनी सांगीतले.

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Web Title: Sn dt 111th foundation day maharshi karve statue unveiling mahakumbh 2 0 pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • College
  • Maharashtra Governor
  • SNDT

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.