Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: “मागण्या मान्य होईपर्यत…”; भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांचा इशारा

दरम्यान पुण्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाहेर आंदोलनाने जोर धरला आहे. त्यामुळे परिसर आंदोलकांच्या घोषणांनी दुमदुमून गेला. दरम्यान या आंदोलनास राज्यातील भूमिअभिलेखच्या सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 15, 2025 | 07:02 PM
Pune News: “मागण्या मान्य होईपर्यत…”; भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला तांत्रिक वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्यात शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग या संघटनेने गुरूवार (दि.15) बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे भूमिअभिलेखच्या पुणे विभागातील सर्वच कार्यालयांचे कामकाज ठप्प पडले असून, कार्यालये ओस पडली आहेत.

दरम्यान पुण्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाहेर आंदोलनाने जोर धरला आहे. त्यामुळे परिसर आंदोलकांच्या घोषणांनी दुमदुमून गेला. दरम्यान या आंदोलनास राज्यातील भूमिअभिलेखच्या सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय मिसाळ, सरचिटणीस अजित लांडे, धनाजी बाबर, कार्याध्याक्ष सुधीर पाटील यांनी दिली आहे.

भूमी अभिलेख विभागातील कर्मचार्यांना तांत्रिक वेतन श्रेणी देण्याकरिता शासनाने तत्कालीन जमाबंदी आयुक्त एन. के . सुधांशु यांचे अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन कडून अहवाल मागितला होता. त्याला जवळपास एक वर्षाचे वर कालावधी लोटला परंतु अद्यापपर्यंत त्या अहवालावर शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळे राज्यभरातील कर्मचार्यांमध्ये वेतनश्रेणीच्या प्रश्नावर तीव्र असंतोष आहे.

भुमिअभिलेख खात्यामधील कर्मचार्यांच्या सेवा भरती नियमा शासनाने 2012 मध्ये दुरुस्ती करून सर्वपदाकरिता तांत्रिक अहर्ता निश्चित केल्यामुळे 2012 पासून या खात्यामधील सर्वच पदाकरिता बी इ सिविल डिग्री, सिविल डिप्लोमा अशी शैक्षणिक अहर्ता लागू केल्यामुळे या खात्यात सर्व पदावर तांत्रिक अहर्ता प्राप्त केलेले कर्मचा-र्यांनाच नियुक्ती दिल्या जातात. परंतु या पदाकरिता पगार हा कारकून संवर्गातील दिल्या जात असल्यामुळे कर्मचारी वर्गात तीव्र असंतोष आहे.

मीटरद्वारे पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव पडणार लांबणीवर

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीपट्टी मीटरद्वारे आकारण्याचा प्रस्ताव लांबणीवर पडू शकतो. निवासी वापराच्या मिळकतींसाठी मीटरद्वारे पाणी पट्टी (बिल) आकारणीची प्रस्ताव गेल्या महिन्याभरापासून आयुक्त कार्यालयात पडून आहे. मीटरद्वारे पाणी बिलात वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी हा प्रस्ताव मंजूर होण्याची चिन्हे नाहीत.

Pune News : मीटरद्वारे पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव पडणार लांबणीवर; महिनाभरापासून प्रस्ताव आयुक्तालयातच पडून

शहरात सध्या समान पाणी पुरवठा (24 तास पाणी पुरवठा ) योजनेचे काम सुरु आहे. याअंतर्गत शहरात जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. तसेच नळजोडाला पाण्याची मीटर बसविण्याचे काम केले जात आहे. पाण्याची गळती रोखणे, पाण्याचा अपव्यय कमी करण्याच्या हेतूने पाणी मीटर लावले जात आहे. सध्या व्यावसायिक वापराच्या मिळकतींना पाण्याचे बिल हे मीटर पद्धतीने देण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वीचे मीटर बदलून त्या ठिकाणी एएमआर पद्धतीचे मीटर बसविले जात आहे. या मीटरद्वारे आकारली जाणारी पाणीपट्टी पूर्वीच्या तुलनेत जास्त येत असल्याने तक्रारीत वाढ झाली आहे.

Web Title: Strike will not called off until demands are acceptedwarns the office bearers of the land records employees association pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 07:01 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Salary Hike

संबंधित बातम्या

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…
1

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा
2

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?
3

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
4

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.