Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सामाजिक न्याय विभागाचा ७४६ कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला? विद्यार्थ्यांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारकडून वारंवार पाठपुरावा करूनही आवश्यक निधी वितरणावर निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 03, 2025 | 09:46 PM
सामाजिक न्याय विभागाचा ७४६ कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला? विद्यार्थ्यांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  सामाजिक न्याय विभागाचा ७४६ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी वळवल्याच्या निषेधार्थ, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार व आधार योजनेंतर्गत लाभ मिळण्यात होत असलेल्या विलंबाविरोधात राज्यभरातील अर्जदार विद्यार्थ्यांनी पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालय कार्यालयासमोर २ जून पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ संपत आले असतानाही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम न पडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गंभीर आर्थिक व मानसिक अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आंदोलक विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे की, लाडकी योजनेसाठी वळवलेला निधी पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडे परत देऊन, स्वाधार-आधार योजनेचे थकीत पैसे तत्काळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत. तसेच स्वाधार योजनेतील लाभ वाढवून ते महागाईच्या प्रमाणात १ लाख रुपये प्रति विद्यार्थी करण्यात यावेत. २०२१ पासून थकीत रकमेचे एकत्रित वितरण, तालुकास्तरावर योजना राबविणे, संकेतस्थळावर बी-स्टेटमेंटचा पर्याय, आणि COEP विद्यापीठातील SC विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी परत करणे यांसारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष संपून सुद्धा विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्वाधार योजना, आधार योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर पडत नाही आणि दुसरीकडे सामाजिक न्याय विभागाचा 746 कोटीचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बेमुदत धरणे आंदोलन योजनांचा लाभ खात्यावर येई पर्यंत चालू असणार आहे.
– राजरत्न बलखंडे (अध्यक्ष, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य)

“ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही त्यांनी…”; लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून फडणवीसांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर

जोपर्यंत आमच्या खात्यावर स्वाधारची रक्कम येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही.
साक्षी पोटे (अर्जदार विद्यार्थी)

2022-23 पासून माझ्या स्वाधार योजनेचे पैसे थकित आहेत. ते मिळत नाही म्हणून मला कोणतेही काम करून शिकावे लागत आहे. अजून किती वाट पहायची म्हणून मी आंदोलन करायला बसलोय.
ऋषिकेश गवई (अर्जदार विद्यार्थी)

राज्य सरकारकडून वारंवार पाठपुरावा करूनही आवश्यक निधी वितरणावर निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. जोपर्यंत योजनांचा लाभ खात्यावर जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

मे आणि जूनचा हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे. अर्थसंकल्प ज्यांना कळत नाही टेक आशा प्रकारचे आरोप करतात. याबाबतीत अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील सभागृहात सांगितलेले आहे. कोणताही पैसा वळवलेला नाही आणि पळवलेला देखील नाही. ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावे. अर्थसंकल्प कसा वाचावा ही पुस्तक मी लिहिलेले आहे. हे पुस्तक मी त्यांना देईन.

Web Title: Students pune staging indefinite protest against diversion of funds from the social justice department to the ladki bahin scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 09:46 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Ladki Bahin Yojana
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
3

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
4

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.