लाडकी बहीण योजनेच्या निधीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला या योजनेनेच घवघवीत यश मिळवून दिले आहे. दरम्यान या योजनेवरून विरोधक कायमच सरकारवर आरोप करताना दिसून येत आहेत. दरम्यान लाडकी बहीण योजनेचे हप्ते देण्यासाठी अन्य विभागाचा निधी वळवला असल्याचे आरोप होत आहेत. त्या आरोपाना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
राज्यातील लाडक्या बहिण योजनेचा हप्ता देण्यासाठी सरकारने अन्य विभागाचा निधी वळवल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे. अर्थसंकल्प ज्यांना कळत नाही टेक आशा प्रकारचे आरोप करतात. याबाबतीत अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील सभागृहात सांगितलेले आहे. कोणताही पैसा वळवलेला नाही आणि पळवलेला देखील नाही. ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावे. अर्थसंकल्प कसा वाचावा ही पुस्तक मी लिहिलेले आहे. हे पुस्तक मी त्यांना देईन.
लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्ता कधी मिळणार?
महिला आणि बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवण्यात आला आहे. विशेषतः आदिवासी विकास विभागाकडून ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, लवकरच मे महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना आणि वादंग
लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना मानली जाते तिचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्याचा आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपूर्वी ह ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली. प्रारंभिक टप्प्यात ही योजना स्त्रियांसाठी मोठा दिलासा ठरली, मात्र अलीकडेच या योजनेमुळे वाद सुरू झाले आहेत.
Pakistan News: भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर पाकिस्तानात बेकायदेशीर
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारमधील काही नेत्यांनी या योजनेतील मदतीची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर देखील ही वाढ प्रत्यक्षात अमलात आणलेली नाही. त्यामुळे सरकारवर टीका होत आहे की, ही योजना केवळ निवडणुकीसाठी दिलेली आश्वासने होती. योजनेसाठी लागणारा निधी वेळेवर उपलब्ध करून देण्यात सरकारला अडचणी येत आहेत. त्यामुळे इतर खात्यांमधून निधी वळवण्याची वेळ येते आहे. यामुळेच काही वेळा हप्ता उशिरा जमा होतो किंवा अधिकृत घोषणा लांबणीवर जाते.