Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhimashankar Temple: श्रावणानंतर भीमाशंकर परिसर चकाचक; भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई

Bhimashankar Temple: पुणे जिल्ह्यातील श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात सुमीत फॅसिलिटीजने २ ते ११ सप्टेंबरदरम्यान विशेष ‘स्वच्छता सप्ताह’ राबवला. या मोहिमेत भीमा नदीच्या पवित्र उगमस्थळासह मंदिर परिसर, नदीचा प्रवाह, रस्ते आणि नाल्यांची स्वच्छता करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 12, 2026 | 11:10 AM
श्रावणानंतर भीमाशंकर परिसर चकाचक; भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई

श्रावणानंतर भीमाशंकर परिसर चकाचक; भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई

Follow Us
Follow Us:
  • भीमाशंकरात सुमीत फॅसिलिटीजचा स्वच्छतेचा पुढाकार
  • दररोज ३० ते ३५ कचरापेट्यांतील कचरा-निर्माल्याचे संकलन
  • भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई
Bhimashankar Temple: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात सुमीत फॅसिलिटीजने विशेष ‘स्वच्छता सप्ताह’ राबवला. श्रावण महिन्याच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर २ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात मंदिर परिसरासोबतच भीमा नदीच्या पवित्र उगमस्थळाच्या स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला.

श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे मंदिर परिसरात कचरा, प्लास्टिक आणि निर्माल्याचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर सुमीत फॅसिलिटीजने स्वतः पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवली. भीमा नदीच्या उगमस्थळी साचलेला गाळ, प्लास्टिक कचरा तसेच भाविकांकडून अर्पण करण्यात आलेले निर्माल्य काढण्यात आले. मंदिर परिसरातून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाचीही स्वच्छता करण्यात आली.

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…

२५ ते ३० सफाई कर्मचारी, ३ पर्यवेक्षक

या मोहिमेसाठी २५ ते ३० सफाई कर्मचारी आणि तीन पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासाठी स्वतंत्र देखरेख वाहन, कचरापेट्या, झाडू, कचऱ्याच्या पिशव्या आणि वैयक्तिक सुरक्षा साधने अर्थात PPE किट्स उपलब्ध करून देण्यात आली. पथकाने कचरा आणि प्लास्टिक संकलनासह मंदिराकडे जाणारे रस्ते, परिसर आणि नाल्यांचीही स्वच्छता केली.

दररोज ३० ते ३५ कचरापेट्यांमधील कचऱ्याचे संकलन

श्रावणातील भाविकांच्या गर्दीमुळे परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत होता. सुमीत फॅसिलिटीजच्या पथकाने दररोज ३० ते ३५ कचरापेट्यांमधील कचरा, प्लास्टिक आणि निर्माल्याचे संकलन केले. जमा झालेल्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

मुंबईतील जुहू आणि वरळी समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता उपक्रम राबवल्यानंतर सुमीत फॅसिलिटीजने भीमाशंकर तीर्थक्षेत्रातही हा उपक्रम हाती घेतला. धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेबरोबरच नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

‘पवित्र स्थळ आणि नदीच्या उगमाची काळजी घेणे ही खरी सेवा’

सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे कार्यकारी अध्यक्ष सुमित साळुंके यांनी सांगितले की, भीमाशंकर हे केवळ आध्यात्मिक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र नसून येथूनच भीमा नदीचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे या पवित्र स्थळासह नदीच्या उगमाची काळजी घेणे ही सेवा असल्याची समूहाची भावना आहे. स्वच्छता मोहीम केवळ कचरा हटवण्यापुरती मर्यादित नसून श्रद्धा, पर्यावरण आणि समाजाप्रती असलेल्या सामूहिक जबाबदारीचा भाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसच्या माहितीनुसार, समूहाचे देशातील २० हून अधिक राज्यांमध्ये कार्यक्षेत्र असून ५० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. फॅसिलिटीज मॅनेजमेंट, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा सेवा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये समूह सेवा पुरवतो.

Ganeshotsav 2026: विसर्जनानंतरही बाप्पा राहणार घरातच! ‘वृक्ष गजानन’ उपक्रमाची पर्यावरणपूरक अनोखी संकल्पना

Web Title: Sumit facilities cleanliness drive at bhimashankar jyotirlinga bhima river origin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Torrent Hydraulic Power Project: टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टला ग्रामस्थांचा विरोध; आंबोटपाठोपाठ भालीवडीतही जागेची मोजणी रद्द
1

Torrent Hydraulic Power Project: टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टला ग्रामस्थांचा विरोध; आंबोटपाठोपाठ भालीवडीतही जागेची मोजणी रद्द

Ulhasnagar News: ‘माझ्या मुलाला सुखरूप परत आणा’; आई रागावली म्हणून घर सोडले, 15 दिवसांपासून फोटोचे बॅनर घेऊन आईचा शोध
2

Ulhasnagar News: ‘माझ्या मुलाला सुखरूप परत आणा’; आई रागावली म्हणून घर सोडले, 15 दिवसांपासून फोटोचे बॅनर घेऊन आईचा शोध

FDA News: एफडीएची राज्यभर धडक कारवाई! 3 महिन्यांत 12,083 तपासण्या; तब्बल 67.20 कोटींचा अन्नसाठा जप्त
3

FDA News: एफडीएची राज्यभर धडक कारवाई! 3 महिन्यांत 12,083 तपासण्या; तब्बल 67.20 कोटींचा अन्नसाठा जप्त

Seven Eleven School अडचणीत! पर्युषण काळातील आहार संदेशाची दखल; प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस
4

Seven Eleven School अडचणीत! पर्युषण काळातील आहार संदेशाची दखल; प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.