Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

” हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार…” पुणे जमावबंदी निर्णयावरून सुप्रिया सुळेंचा सवाल

आज (26 मे) रात्रीपासून पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत. या निर्णयावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले असून "हे करून पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहत आहेत?" असा सवाल उपस्थित केला आहे.

  • By विवेक
Updated On: May 26, 2026 | 05:33 PM
Supriya Sule

Supriya Sule

Follow Us
Follow Us:

पुणे शहर पोलिसांनी यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आज (26 मे) रात्रीपासून पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने परिपत्रक जारी केले असून पुढील १५ दिवस हा जमावबंदीचा आदेश लागू असणार आहे. या जमावबंदीच्या काळात पाच जणांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याशिवाय जमावबंदीच्या काळात आंदोलने मोर्चे आणि सभांनाही बंदी घालण्यात आले आहे. या निर्णयावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले असून “हे करून पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहत आहेत?” असा सवाल उपस्थित केला आहे.

पुणे शहर पोलिसांनी यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाने आज रात्रीपासून, म्हणजेच २६ मे २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. हे आदेश ८ जून २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत.यावरून सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ हॅण्डलवरून पोस्ट करत प्रश्न उपस्थित केले आहेत.

” कांदा उत्पादक आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न,” रोहित पवार यांची राज्य सरकारवर टीका

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

आपल्या पोस्टमधून त्या म्हणाल्या, “पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले आहे. या शहरात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय ?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले… — Supriya Sule (@supriya_sule) May 26, 2026

पुढे त्या म्हणाल्या, “एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलीसांना अद्याप किंचितही यश आलेले नाही. शहरात गुन्हेगारी सतत वाढत असून महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलीस देऊ शकत नाहीत. कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे.गोळीबाराच्या, लूटमारीच्या, दहशत माजविल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करुन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहत आहेत ?”

“पोलीस आयुक्त, जमाबंदी नाही प्रतिबंधात्मक आदेश असं म्हणत आहेत. जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे ? हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार आहे,” अश्या शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Pune Section 144: पुणेकरांसाठी मोठी बातमी! आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू! ८ जूनपर्यंत कडक निर्बंध

Web Title: Supriya sule reacts over section 144 imposed in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • Pune
  • Section 144
  • supriya sule

संबंधित बातम्या

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
1

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.