Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी’; पक्षांतराच्या अफवांवर सुप्रिया सुळे संतापल्या

ऑपरेशन टायगर-3च्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षांतराच्या अफवांवर मिश्कील शैलीत प्रतिक्रिया दिली. 'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय' म्हणत त्यांनी सातत्याने सुरू असलेल्या चर्चांवर उपरोधिक टोला लगावला.

  • By विवेक
Updated On: Jul 11, 2026 | 02:51 PM
MP Supriya sule

MP Supriya sule

Follow Us
Follow Us:
  • सुप्रिया सुळे यांनी पक्षांतराच्या चर्चांवर ‘आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी’ म्हणत मिश्कील प्रतिक्रिया दिली.
  • ‘ऑपरेशन टायगर-3’ अंतर्गत ठाकरे गटासह शरद पवार गटातील लोकप्रतिनिधींशी संपर्क सुरू असल्याचा सूत्रांचा दावा.
  • शिंदे गटाचे दावे आणि पक्षांतराच्या चर्चांवर अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नाही
 

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एनडीए मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. सातत्याने रंगणाऱ्या या चर्चांवरून आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्किल शैलीत नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी राजकीय अफवांवर उपरोधिक भाष्य केले.

‘आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय’

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्यांच्या आठ खासदारांचा व्हॉट्सॲप ग्रुप असून त्यात रोज माध्यमांमध्ये सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांवर विनोद केला जातो. त्या म्हणाल्या, “आम्हाला टीव्हीवर रोज नवीन पक्षात पाठवले जाते. आता फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय. आम्हाला कमोडिटी करून ठेवलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार इंटरनॅशनल करून टाका, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करतो असेही सांगा.” त्यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

ऑपरेशन टायगर-3ची चर्चा पुन्हा रंगली

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर-3’ राबविण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही आमदार आणि खासदारांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकप्रतिनिधींशी संपर्क सुरू असल्याचा दावा केला जात आहे.

Dhairyashil Mohite यांची कथित Audio Clip Viral; धमकीच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

शिंदे गटातील सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटातील दहा आमदारांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सुरू असून पक्षांतरबंदी कायद्याचे गणित जुळवण्यासाठी आणखी काही आमदारांशीही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, ठाकरे गटातील आणखी एका खासदाराशी संपर्क साधल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यांबाबत संबंधित पक्षांकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

शरद पवार – एकनाथ शिंदे भेटीमुळे राजकीय चर्चाना उधाण

बुधवारी विधान भवनात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळासाठी बैठक सोडून शरद पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही मिनिटे चर्चा झाली. मात्र या चर्चेचा नेमका विषय अद्याप अधिकृतपणे समोर आलेला नाही. या अनपेक्षित भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

माहितीनुसार, शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर, रोहित पाटील आणि अभिजीत पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार उपस्थित होते. बैठकीत आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

एकनाथ शिंदेंचा नवा गेम प्लॅन? ‘Operation Tiger 3’ने ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा, 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा

कर्जत तालुक्याच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शरद पवार गट एकत्र

राज्यात हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच आता मात्र तालुका लेव्हलवर ते एकत्र आले आहेत. अहिल्यानंगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शरद पवार गट एकत्र आले असून कर्जतच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार यांची निवड झाली आहे.

नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्यावर अविश्वास ठराव करण्यात येणार होता. पण त्यापूर्वीच त्यांनी आपला राजीनामा दिला. रोहिणी घुले यांना बाजूला ठेवण्यासाठी भाजपचे राम शिंदे आणि शरद पवार गटाचे रोहित पवार एकत्र आले. यामुळे कर्जत नगर पंचायतीवर राम शिंदे यांचं वर्चस्व कायम राहणार आहे. कर्जत – जामखेडच्या राजकारणात राम शिंदे आणि रोहित पवार हे एकमेकांचे विरोधक मानले जातात. रोहित पवारांनी दोनदा रामशिंदेंचा पराभव केला आहे. परंतु आता बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार दोन्ही राजकीय पक्ष एकत्र आले आहेत.

Web Title: Supriya sule operation tiger 3 reaction party switch rumours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • BJP
  • Mahavikas Aghadi
  • NCP Sharad Pawar
  • Sharad Pawar
  • supriya sule

संबंधित बातम्या

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
1

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा
2

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार
3

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
4

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.