Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-पुणे रेल्वेच्या ३० गाड्या रद्द होताच प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’, उद्यापासून २०० अतिरिक्त बसफेऱ्या सुरू

Mumbai Pune Extra ST Bus: मुंबई-पुणे मार्गावरील ३० रेल्वे गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी एसटी महामंडळाने उद्यापासून २०० अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर वेळापत्रक.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 10, 2026 | 08:44 PM
मुंबई-पुणे मार्गावर उद्यापासून धावणार २०० अतिरिक्त एसटी बसेस (Photo Credit- X)

मुंबई-पुणे मार्गावर उद्यापासून धावणार २०० अतिरिक्त एसटी बसेस (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे प्रवाशांनो काळजी नको!
  • मुंबई-पुणे मार्गावर उद्यापासून धावणार २०० अतिरिक्त एसटी बसेस
  • धावून आली ‘लालपरी’
मुंबई, दि. १० : मुंबई–पुणे मार्गावरील दररोज धावणाऱ्या सुमारे ३० रेल्वे गाड्या रद्द असल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तातडीने अतिरिक्त बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून या मार्गावर दररोज २०० अतिरिक्त बसफेऱ्या चालविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

या विशेष नियोजनाअंतर्गत ई-शिवनेरीच्या ३१२ नियोजित फेऱ्या सह साध्या बसेसच्या २०० जादा फेऱ्या मुंबई–पुणे मार्गावर दररोज चालविण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड पर्यायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Pratap Sarnaik : RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा

याशिवाय, प्रवाशांची प्रत्यक्ष गर्दी लक्षात घेऊन संबंधित आगार आणि विभागांना आवश्यकतेनुसार आणखी जादा बसेस सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रवाशाला वाहतुकी अभावी अडचण येऊ नये, यासाठी एसटी प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “संकटाच्या प्रत्येक काळात एसटीने जनतेचा विश्वास सार्थ ठरविला आहे. रेल्वे सेवा बाधित झाल्यानंतरही प्रवाशांचा प्रवास सुरळीत राहावा, यासाठी एसटी महामंडळ पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. प्रवाशांची सुरक्षितता, सोय आणि वेळेवर सेवा हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, गरजेनुसार आणखी अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात येईल.”
रेल्वे सेवा प्रभावित झालेल्या परिस्थितीत एसटीची ही अतिरिक्त सेवा लाखो प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, मुंबई–पुणे मार्गावरील प्रवास अधिक सुलभ आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

रद्द करण्यात आलेल्या प्रमुख गाड्यांमध्ये डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, पुणे–सीएसएमटी इंटरसिटी, सीएसएमटी–हैदराबाद एक्स्प्रेस, हुबळी–दादर एक्स्प्रेस, दौंड–इंदूर एक्स्प्रेस आणि चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल यांचा समावेश आहे. तसेच महालक्ष्मी एक्स्प्रेस, दादर–सातारा, दादर–साईनगर शिर्डी या गाड्याही विविध तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत.

याशिवाय सीएसएमटी–गोरखपूर, पुणे–गोरखपूर, पुणे–गाझीपूर सिटी आणि पुणे–हजरत निजामुद्दीन या विशेष गाड्याही संबंधित तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. रेल्वे सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी चोवीस तास काम करत आहेत.

Pratap Sarnaik : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; टॅक्सी, रिक्षा, बस चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक

Web Title: 200 additional st buses to run on the mumbai pune route starting tomorrow the lalpari comes to the rescue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • Mumbai
  • pratap sarnaik
  • Pune
  • Railway News
  • st bus news

संबंधित बातम्या

Matheran News : मिनीबस चालकाची ज्येष्ठ नागरिकांशी अरेरावी; माथेरानच्या प्रवासात प्रवाशांचा संताप
1

Matheran News : मिनीबस चालकाची ज्येष्ठ नागरिकांशी अरेरावी; माथेरानच्या प्रवासात प्रवाशांचा संताप

Pradeep Purnekar: ‘Next Target तू…’, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड, प्रताप सरनाईकांसमोर पुतणीचा धक्कादायक खुलासा
2

Pradeep Purnekar: ‘Next Target तू…’, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड, प्रताप सरनाईकांसमोर पुतणीचा धक्कादायक खुलासा

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड
3

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
4

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.