Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पर्यावरण बदलासाठी मानसिकतेत बदल आवश्यक; सुरेश प्रभू

हवामान बदल ही मानव निर्मित समस्या आहे. हवेची गुणवत्ता खराब होत असून त्यातून अनेक आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. त्यावर उपाय म्हणून रुग्णालयांची संख्या वाढवण्याऐवजी समस्येच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे, असे प्रभू म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 27, 2025 | 02:35 AM
Pune News: पर्यावरण बदलासाठी मानसिकतेत बदल आवश्यक; सुरेश प्रभू
Follow Us
Follow Us:

पर्यावरण आणि हवामान बदलाचा विषय अधिक संवेदनशील
आपल्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची नितांत आवश्यकता
सुरेश प्रभू यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

पुणे: गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण आणि हवामान बदलाचा विषय अधिक संवेदनशील बनला असून या बदलांना सामोरे जाताना प्रत्येकाने आपल्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. जे. पी. श्रॉफ फाउंडेशनतर्फे आयोजित ‘सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्कार २०२५’ सोहळ्यात पुण्यात बोलत होते. यावेळी प्रभू यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बोट क्लब येथे झालेल्या या कार्यक्रमाला डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रदीप भार्गव, गणेश नटराजन, आशिष गायकवाड, जे. पी. श्रॉफ, सुजाता श्रॉफ आदी मान्यवर उपस्थित होते. याच सोहळ्यात स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव कुणाल कुमार, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या महासंचालिका सुनीता नारायण, कोरु कार्टन इंडिया संस्थेचे संदीप अग्रवाल, अशाया वेस्ट रिसायकल्सचे संस्थापक अनिश मालपाणी आणि थरमॅक्सच्या अध्यक्षा मेहेर पदमजी यांना सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Pune News: ‘पाण्याचा प्रश्न सर्वच घटकांना…”; ‘या’ कार्यक्रमात काय म्हणाले सुरेश प्रभू?

प्रभू म्हणाले, हवामान बदल ही मानव निर्मित समस्या आहे. हवेची गुणवत्ता खराब होत असून त्यातून अनेक आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. त्यावर उपाय म्हणून रुग्णालयांची संख्या वाढवण्याऐवजी समस्येच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. मानसिकता बदलाच्या प्रक्रियेला सामाजिक व धार्मिक मूल्यांची जोड दिल्यास हा बदल अधिक वेगाने घडू शकतो.

पुरस्कार सोहळ्यापूर्वी ‘शाश्वत संस्था, शहरे आणि समाज’ या विषयावर चर्चासत्र झाले. शहरे पर्यावरणपूरक व शाश्वत असणे अपरिहार्य असल्याचे कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानाच्या वापरातून शाश्वत विकास साधता येईल, असे मत शेखर सिंह यांनी व्यक्त केले. अंकिता व प्रणती श्रॉफ यांनी सस्टेन अँड सेव्ह उपक्रमाविषयी माहिती दिली. सिद्धार्थ भागवत यांनी सूत्रसंचलन केले. नम्रता यांनी आभार मानले.

पाण्याचा प्रश्न सर्वच घटकांना भेडसावत आहे – प्रभू

जागतिक पातळीपासून स्थानिक स्तरापर्यंत पाण्याचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन आणि संरक्षण  झाले नाही, तर भविष्यात मानवी अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पाण्याचे संवर्धन आणि संरक्षण ही आजच्या काळाची अत्यावश्यक गरज असल्याचे मत ऋषीहूड युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.

Web Title: Suresh prabhu said a change in mindset is necessary for environmental change pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Cultural Event
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.