Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीएमआरडीएचा ‘अभियांत्रिकी’वर भर; रस्ते, मेट्रो अन् बोगद्यासाठी निधीचे मोठे आव्हान

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आगामी अर्थसंकल्पीय बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असतानाच, प्राधिकरणाने चालू आर्थिक वर्षात सर्वाधिक खर्च अभियांत्रिकी प्रकल्पांवर केल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 23, 2026 | 05:31 PM
पीएमआरडीएचा ‘अभियांत्रिकी’वर भर; रस्ते, मेट्रो अन् बोगद्यासाठी निधीचे मोठे आव्हान

पीएमआरडीएचा ‘अभियांत्रिकी’वर भर; रस्ते, मेट्रो अन् बोगद्यासाठी निधीचे मोठे आव्हान

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आगामी अर्थसंकल्पीय बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असतानाच, प्राधिकरणाने चालू आर्थिक वर्षात सर्वाधिक खर्च अभियांत्रिकी प्रकल्पांवर केल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्ते, मेट्रो, नदी सुधार आणि सांडपाणी व्यवस्थापनासह बहुचर्चित कात्रज-येरवडा दुमजली बोगद्यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी आगामी काळात मोठा निधी उभा करण्याचे कठीण आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

 

स्वतःच्या हद्दीलाच प्राधान्य

विशेष म्हणजे, पीएमआरडीए आता स्वतःच्या कार्यक्षेत्राबाहेरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत विकासकामांसाठी निधी खर्च करण्याबाबत ‘हात आखडता’ घेण्याची चिन्हे आहेत. मूळ उद्दिष्टाला बाधा येऊ नये, यासाठी हा सावध पवित्रा घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तिजोरीत काय आणि किती?

पीएमआरडीएचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या आठवड्यात वार्षिक अर्थसंकल्पीय सभा होण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात पीएमआरडीएला विविध स्रोतांतून १३१०.७७ कोटी रुपये प्राप्त झाले. त्यापैकी १२०८.७० कोटी रुपये खर्च झाले असून, यात सर्वाधिक ६२२ कोटी रुपये केवळ अभियांत्रिकी प्रकल्पांवर खर्च झाले आहेत.

जमा महसूल : बांधकाम परवानगी विभागातून सर्वाधिक ६८४.४५ कोटी, तर जमीन व मालमत्ता विभागातून ४७२.३२ कोटी रुपये जमा झाले आहेत. अग्निशमन दलाच्या माध्यमातून १३४ कोटी रुपये मिळाले आहेत.

खर्चाचा ताळेबंद : अभियांत्रिकीनंतर ‘पीएमपीएमएल’ला २३० कोटी रुपये देण्यात आले आहेत. प्रशासकीय खर्चासाठी ३१९.९६ कोटी, तर आस्थापना खर्चासाठी १७.५६ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

४७४९ कोटींची थकबाकी प्रलंबित

पीएमआरडीएची आर्थिक स्थिती भक्कम दिसत असली, तरी शासनाकडून येणारी मोठी रक्कम अद्याप रखडलेली आहे. शहरी मुद्रांक शुल्कापोटी तब्बल ४१४३.२५ कोटी रुपये शासनाकडून येणे बाकी आहे. तसेच जिल्हा परिषदेकडून ग्रामीण मुद्रांक शुल्काचे ३०४.७४ कोटी आणि महापालिकांकडून ‘टीओडी’पोटी मोठी रक्कम येणे बाकी आहे. ही एकूण थकबाकी ४७४९.६१ कोटी रुपयांच्या घरात आहे.

बोगद्याचे ‘तांत्रिक’ आव्हान

कात्रज-येरवडा या दुमजली बोगद्याचा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या जितका महत्त्वाकांक्षी आहे, तितकाच तो आर्थिकदृष्ट्या खर्चिक आहे. या प्रकल्पासाठी अवाढव्य निधी उभा करणे हे प्रशासनापुढील मोठे उद्दिष्ट असणार आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी नेमकी काय तरतूद केली जाते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

हे सुद्धा वाचा : भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला होणार मतदान

एका दृष्टिक्षेपात पीएमआरडीएची तिजोरी :

एकूण जमा : १३१०. ७७ कोटी रुपये
एकूण खर्च : १२०८. ७० कोटी रुपये
व्याजातून उत्पन्न : २९६ कोटींच्या मुदत ठेवींवर (FD) वार्षिक २०९ कोटी रुपये व्याज.
शासनाकडून येणे बाकी : ४१४३.२५ कोटी रुपये (शहरी मुद्रांक शुल्क)

Web Title: The administration faces the challenge of raising funds for many important projects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pimpri Chinchwad
  • PMRDA

संबंधित बातम्या

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
2

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
3

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा
4

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.