Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हीआयपी दौऱ्याने लोणावळ्याचे रस्ते झाले मोकळे! सर्वसामान्यांसाठी हीच तत्परता कधी? नागरिकांचा सवाल

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या लोणावळा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगतचे अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे केले. त्यामुळे नेहमी वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या लोणावळेकरांना व्हीआयपी दौऱ्याच्या निमित्ताने काही काळ दिलासा मिळाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 18, 2026 | 04:56 PM
व्हीआयपी दौऱ्याने लोणावळ्याचे रस्ते झाले मोकळे! सर्वसामान्यांसाठी हीच तत्परता कधी? नागरिकांचा सवाल

व्हीआयपी दौऱ्याने लोणावळ्याचे रस्ते झाले मोकळे! सर्वसामान्यांसाठी हीच तत्परता कधी? नागरिकांचा सवाल

Follow Us
Follow Us:

लोणावळा : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या लोणावळा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगतचे अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे केले. काही ठिकाणी रस्त्यांची आवश्यक कामेही तातडीने करण्यात आली. त्यामुळे नेहमी वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या लोणावळेकरांना व्हीआयपी दौऱ्याच्या निमित्ताने काही काळ दिलासा मिळाला आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी लोणावळ्यातील एका संस्थेला भेट दिल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून महामार्गालगतच्या पेरू विक्रेत्यांसह अन्य विक्रेत्यांच्या टपऱ्या हटविण्यात आल्या. रस्त्यांच्या कडेला असलेले अडथळे दूर झाल्याने वाहतुकीला काही प्रमाणात मोकळीक मिळाली. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या आणि वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या रस्त्यांवर काही काळ मोकळेपणाचे चित्र पाहायला मिळाले.

 

वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम

लोणावळा शहरात पर्यटन हंगाम, वाढती वाहनसंख्या आणि रस्त्यालगत होणारे अतिक्रमण यामुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याचा फटका स्थानिक नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना बसत आहे. रस्त्यांच्या कडेला उभ्या राहणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या आणि अन्य अडथळ्यांमुळे वाहतुकीच्या प्रवाहावर परिणाम होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. अतिक्रमण हटविणे, वाहतूक नियोजन करणे आणि कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. मात्र, नियमित कारवाई करण्याऐवजी व्हीआयपी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच रस्ते मोकळे आणि सुस्थितीत केले जात असल्याचे चित्र दिसल्याने नागरिकांकडून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

‘व्हीआयपींच्या दौऱ्यावेळीच आठवण होते का?’

‘व्हीआयपींच्या दौऱ्यावेळीच प्रशासनाला अतिक्रमण आणि रस्त्यांची आठवण होते का?’ असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यासाठी रस्ते तातडीने स्वच्छ आणि वाहतुकीसाठी मोकळे केले जात असतील, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही अशीच तत्परता नियमितपणे का दाखवली जात नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. व्हीआयपी मूव्हमेंटपुरते रस्ते मोकळे करण्याऐवजी शहरातील अतिक्रमणावर नियमित नियंत्रण ठेवणे, वाहतूक व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करणे आणि रस्त्यांची वेळोवेळी देखभाल करणे आवश्यक आहे. पर्यटन शहर म्हणून लोणावळ्यात वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडीवर तात्पुरत्या कारवाईऐवजी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कारची ट्रकला जोरदार धडक , २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

नियमित कारवाईची मागणी

व्हीआयपी दौऱ्याच्या निमित्ताने प्रशासनाची यंत्रणा वेगाने काम करू शकते, तर त्याच पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्यांकडेही नियमितपणे लक्ष दिले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ‘व्हीआयपी मूव्हमेंट रोजच व्हावी’ अशी उपरोधिक अपेक्षा व्यक्त करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये, यासाठी अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर नियमित व ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: The administration has removed encroachments due to the vice presidents visit to lonavala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Lonavala news
  • Traffic News

संबंधित बातम्या

शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने फिरवली पाठ, सोयाबीनची वाढ खुंटली; उत्पादन घटण्याची शक्यता
1

शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने फिरवली पाठ, सोयाबीनची वाढ खुंटली; उत्पादन घटण्याची शक्यता

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
2

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
3

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?
4

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.