Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने फिरवली पाठ, सोयाबीनची वाढ खुंटली; उत्पादन घटण्याची शक्यता

सुरुवातीच्या पावसावर चांगली उगवण झाल्याने यंदा सोयाबीनचे पीक हातात येईल, अशी आशा बाळगलेल्या जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या चिंतेत आता मोठी भर पडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 18, 2026 | 05:19 PM
शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने फिरवली पाठ, सोयाबीनची वाढ खुंटली; उत्पादन घटण्याची शक्यता

शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने फिरवली पाठ, सोयाबीनची वाढ खुंटली; उत्पादन घटण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : सुरुवातीच्या पावसावर चांगली उगवण झाल्याने यंदा सोयाबीनचे पीक हातात येईल, अशी आशा बाळगलेल्या जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या चिंतेत आता मोठी भर पडली आहे. शेंगा भरण्याचा आणि दाणे तयार होण्याचा निर्णायक टप्पा सुरू असतानाच पावसाने दडी मारल्याने अनेक शेतांमधील सोयाबीनची वाढ खुंटली असून, पाने पिवळी पडून वाळू लागली आहेत. काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्याने पिकाला आवश्यक ओलावा मिळेनासा झाला आहे.

 

आळे, वडगाव आनंद, संतवाडी, कोळवाडी, राजुरी, पिंपळवंडी, बोरी बुद्रुक, आणे, शिंदेवाडी आदी परिसरात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकाची उगवण समाधानकारक झाली. मात्र त्यानंतर पावसाने खंड दिल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. सध्या सोयाबीनच्या शेंगा भरण्याचा महत्त्वाचा काळ आहे. याच काळात पिकाला पुरेसा पाऊस मिळणे अपेक्षित असताना पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे. कोरडवाहू क्षेत्रातील परिस्थिती अधिक गंभीर असून काही शेतांमध्ये पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.

विहिरी-कूपनलिकेच्या पाण्यावर किती भाग वाचवायचा?

पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी उपलब्ध पाण्याचा आधार घेत आहेत. मात्र विहिरी आणि कूपनलिकांमध्येही मर्यादित पाणीसाठा असल्याने संपूर्ण क्षेत्राला पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करण्याशिवाय अनेक शेतकऱ्यांसमोर पर्याय उरलेला नाही. सोयाबीनच्या उत्पादनावरच अनेक शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील आर्थिक गणित अवलंबून आहे. पाऊस आणखी लांबल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असून लागवड, खते, औषधे आणि मशागतीवर झालेला खर्च भरून काढणेही कठीण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

सोयाबीनला सध्या पाण्याची मोठी गरज आहे. मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने कोरडवाहू क्षेत्रातील परिस्थिती गंभीर झाली आहे. उपलब्ध पाणी मर्यादित असल्याने सर्वच क्षेत्राला पाणी देणे शक्य होत नाही. – सुरेश चौगुले, शेतकरी.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषानुसार मदत मिळावी

पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्यास प्रशासनाने संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार मदत मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. एकीकडे आभाळाकडे नजर, तर दुसरीकडे सुकणाऱ्या सोयाबीनकडे पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आता पावसाची एक सर केवळ पीकच नाही, तर शेतकऱ्यांचे बिघडलेले आर्थिक गणितही वाचवू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा : व्हीआयपी दौऱ्याने लोणावळ्याचे रस्ते झाले मोकळे! सर्वसामान्यांसाठी हीच तत्परता कधी? नागरिकांचा सवाल

Web Title: Soybean crops in junnar taluka are suffering damage due to the lack of rainfall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • junnar news

संबंधित बातम्या

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती
1

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती

व्हीआयपी दौऱ्याने लोणावळ्याचे रस्ते झाले मोकळे! सर्वसामान्यांसाठी हीच तत्परता कधी? नागरिकांचा सवाल
2

व्हीआयपी दौऱ्याने लोणावळ्याचे रस्ते झाले मोकळे! सर्वसामान्यांसाठी हीच तत्परता कधी? नागरिकांचा सवाल

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
3

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक
4

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.