Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती, विकासकामांना स्थायीची मंजुरी; बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शहराच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य प्रशासकीय इमारतीतील सभागृहात ही बैठक झाली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 17, 2026 | 05:24 PM
पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती, विकासकामांना स्थायीची मंजुरी; बैठकीत घेतले 'हे' मोठे निर्णय

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती, विकासकामांना स्थायीची मंजुरी; बैठकीत घेतले 'हे' मोठे निर्णय

Follow Us
Close
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती
  • विकासकामांना स्थायीची मंजुरी
  • बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय
पिंपरी : पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शहराच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य प्रशासकीय इमारतीतील सभागृहात ही बैठक झाली. सभेला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि प्रशासनाशी संबंधित अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले आहेत.

 

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत शहरातील झोपडपट्टी व दाट वस्ती भागांमध्ये गटार, स्टॉर्म वॉटर लाईन, शौचालय दुरुस्ती आणि इमारतींची देखभाल यासारखी कामे मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहेत. निगडी- दापोडी, सांगवी-किवळे आदी प्रमुख मार्गांसह विविध प्रभागांतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

सबवे उभारण्यासाठी सल्लागार नेमणार

वाहतूक सुधारण्यासाठी पिंपळे सौदागर येथील पीके चौक सिग्नलमुक्त करण्यासाठी आणि कल्पतरू चौकात सबवे उभारण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी विविध रुग्णालयांमध्ये उपकरणे खरेदी, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, थेरगाव येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : गरिबाच्या फ्रीजला वाढली मागणी; कुंभारवाड्यांमध्ये माठ बनवणाऱ्या कारागीरांची लगबग सुरू

महिला बचत गटांना मुदतवाढ, मानधनवाढ

शैक्षणिक क्षेत्रात महापालिका शाळांमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर नेमणे, परीक्षा साहित्य छपाई आणि संगणकीय सुविधा उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे. स्वच्छता व्यवस्थापनासाठी महिला बचत गटांना मुदतवाढ व मानधनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

कौशल्यममधून युवकांना रोजगाराच्या संधी – महापौर रवि लांडगे

कौशल्याधारित प्रशिक्षणामुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून, अशा प्रकल्पांचा विस्तार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. निगडी येथील यमुनानगर परिसरातील कौशल्यम लाईट हाऊस प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते. महापौरांनी प्रकल्पाचा आढावा घेत प्रशिक्षण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. प्रशिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवलेल्या युवकांशी संवाद साधत त्यांच्या यशाचे कौतुक केले. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य उत्तम केंदळे, अनिल घोलप, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: The development works of pimpri chinchwad have been approved in the standing committee meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Dharashiv News: धाराशिवच्या माविमचा राज्यात दुसरा क्रमांक, बचतगटांच्या बळावर महिलांची झेप
1

Dharashiv News: धाराशिवच्या माविमचा राज्यात दुसरा क्रमांक, बचतगटांच्या बळावर महिलांची झेप

Heat Wave News: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! पारा ४१ अंशांवर; दुपारी रस्ते ओस तर…
2

Heat Wave News: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! पारा ४१ अंशांवर; दुपारी रस्ते ओस तर…

‘ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण अनिवार्य, चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
3

‘ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण अनिवार्य, चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली, ती मान्य न झाल्यास…; काँग्रेसचा इशारा
4

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली, ती मान्य न झाल्यास…; काँग्रेसचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.