Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली, ती मान्य न झाल्यास…; काँग्रेसचा इशारा

निवडणूक आयोगाचा कारभार एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा आहे, असा आरोप काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 17, 2026 | 12:02 PM
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली, ती मान्य न झाल्यास...; काँग्रेसचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली, ती मान्य न झाल्यास...; काँग्रेसचा इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : मागील काही वर्षापासून निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी अनेक राज्यातून विविध राजकीय पक्षांनी केलेल्या आहेत. मतदार याद्यातील घोळ, EVM मधील घोळ यावर अनेक तक्रारी करण्यात आल्या पण निवडणूक आयोग त्याचे समाधानकारक उत्तर देत नाही. निवडणूक आयोगाचा कारभार एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा आहे, असा आरोप काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान यांनी केला आहे.

 

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चांदवली मतदारसंघात EVM मध्ये घोटळा झाल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांनी उच्च न्यायालयात केली होती. सुनावणीत उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीन तपासणीचे आदेश दिले आहेत. दिनांक १६ व १७ एप्रिलला यातील काही मशीनची तपासणी बोरीवली येथे सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर नसीम खान प्रसार माध्यमांशी बोलत होते.

नसीम खान पुढे म्हणाले की, न्यायालयाने डेटा सहित तपासणी करण्याचा आदेश दिला होता, तो पाळण्यास निवडणूक आयोग टाळाटाळ करत आहे. निवडणूक आयोगाची SOP सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांना हरताळ फासणारी आहे. CU, BU, VVPAT फक्त जोडणी करून दाखवली. त्याला आमचा विरोध आहे. यासंबंधी निवडणूक आयोगाला पत्र देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली आहे, ती मान्य न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही नसीम खान यांनी दिला आहे.

लोकशाहीमध्ये निवडणुका या निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात पार पाडल्या पाहिजेत व त्याची सर्व जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने निवडणूक आयोगाचा गैरकारभार, घोटाळे यांचा पर्दाफाश केलेला आहे पण आयोग मात्र विरोधांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही म्हणून आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. हा फक्त चांदिवली विधानसभा निवडणुकीपुरता मर्यादित नाही तर हा लोकशाही आणि निवडणुकांची निष्पक्षता व पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत राहू, असेही नसीम खान म्हणाले.

हे सुद्धा वाचा : बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटमध्ये IPS दत्ता कराळेंसह दोन पोलीस अधिक्षकांचा सहभाग; काँग्रेसचा गंभीर आरोप

Web Title: Congress leader naseem khan has made serious allegations against the election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Congress
  • Election Commision
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
2

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
3

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.