Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heat Wave News: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! पारा ४१ अंशांवर; दुपारी रस्ते ओस तर…

रखरखत्या उन्हामुळे आणि वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दरम्यान वाढत्या उष्प्यामुळे शहरासह महामार्गावर सुध्दा दुपारी वाहनांची रहदारीच्या संख्येत कमालीची घट दिसत असल्याचे दिसते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 17, 2026 | 02:50 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा!
  • पारा ४१ अंशांवर
  • दुपारी रस्ते ओस तर…
छत्रपती संभाजीनगर / पैठण (शहर प्रतिनिधी): गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानाचा पारा चढू लागला असून, त्यामुळे एप्रिल महिना चांगलाच ‘हिट’ ठरत आहे. रखरखत्या उन्हामुळे आणि वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दरम्यान वाढत्या उष्प्यामुळे शहरासह महामार्गावर सुध्दा दुपारी वाहनांची रहदारीच्या संख्येत कमालीची घट दिसत असल्याचे दिसते. यंदा एप्रिल महिना सुरू होताच वाढत्या तापमानामुळे उष्माघात आणि उष्णतेच्या लाटेचा नागरिकांवर गंभीर परिणाम होत आहे.

वातावरणातील बदलांमुळे तापमान सातत्याने वाढत असून तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत आहे. परिणामी सकाळी ११ वाजतापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे दक्षता घेण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागांना देण्यात आल्या आहेत. वाढत्या अनुषंगाने उष्णतेच्या जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. तर, या एसओपींची प्रभावी करण्याचे अंमलबजावणी व्यवस्थापन विभागाने केले आहे.

तसेच उष्मालाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उन्हाळ्यात सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्यावे आणि ओआरएस तसेच लिंबूपाणी, ताक, फळांचे रस यांसारखे घरगुती द्रव पदार्थ सेवन करावेत. हलके, सैलसर आणि सूती कपडे परिधान करावेत. डोक्यावर टोपी, गॉगल आणि छत्रीचा वापर करावा. उष्णतेच्या लाटेच्या वेळी थेट उन्हामध्ये कष्टाची कामे टाळावीत.

Chhatrapati Sambhajinagar: १० विषय समित्यांसाठी ८३ सदस्यांची बिनविरोध निवड, जिल्हा परिषदेचा अखेर ‘कोरम’ पूर्ण !

गरिबांच्या ‘फ्रीज’ची मागणी वाढली

फ्रिजच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य कुटुंबांना फ्रिज खरेदी करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत, ‘गरिबांचा फ्रिज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांना मागणी वाढली आहे. नैसर्गिकरीत्या पाणी थंड ठेवणारे हे माठ आरोग्यदायी असल्याने नागरिक त्यांना पसंती देत आहेत. ४० ते ४२ अंश तापमानात गारव्यासाठी हेच माठ आता मोठा आधार ठरत आहेत.

हवामान विभागाचा इशारा

वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी ?

शेतात राबणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांना उन्हाचा सर्वाधिक फटका बसतो. त्यांनीही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. कामाच्या वेळा बदलाव्यात. शेतीची कामे पहाटे लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर करा. दुपारच्या कडक उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळा. शेतात काम करताना डोक्याला पांढरा पंचा किंवा टोपी घट्ट बांधा जेणेकरून थेट उन्हाचा संपर्क येणार नाही. बाष्पीभवन टाळण्यासाठी पिकांना पाणी देताना ते सायंकाळी किवा रात्रीच्या वेळी द्यावे. शक्य असल्यास ठिबक सिंचनाचा वापर करा. पाळीव जनावरांना सावलीत बांधा. त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या हौदात ताजे पाणी ठेवा आणि त्यांना दिवसातून किमान दोन वेळा अंघोळ घाला, असे आवाहन पाचोड ग्रामीण रुग्णालयातर्फे करण्यात आले.

Heat Wave: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४१.४ अंशांवर! प्रशासनाकडून ‘हीट वेव्ह’चा इशारा; आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’ मोडवर

Web Title: Ashok kharat associate jitendra shelke death samruddhi accident suspicious angle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • heat wave
  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.