Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल; विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टकडून डेक्कन जिमखाना पोलिसांचा सन्मान

गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखत उत्सव सुरळीत आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 03, 2026 | 05:01 PM
गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल; विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टकडून डेक्कन जिमखाना पोलिसांचा सन्मान

गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल; विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टकडून डेक्कन जिमखाना पोलिसांचा सन्मान

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल
  • नवयुग मित्र मंडळकडून पोलिसांचा सन्मान
  • कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन्मान सोहळा
पुणे : गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखत उत्सव सुरळीत आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र कर्तव्य बजावत उत्सवातील गर्दीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली.

 

विशेषतः गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर जमलेल्या गर्दीचे संयमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्यात पोलिसांची महत्त्वाची भूमिका राहिली. या उल्लेखनीय कामगिरीची विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टने दखल घेत डेक्कन जिमखाना येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी यांचा राष्ट्रीय लॉन टेनिसपटू अर्जुन कढे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी डेक्कन पोलीस ठाण्याच्या रुणाल मुल्ला यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नगसेवक सुनील पांडे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका मिताली सावळेकर, नगरसेवक अपूर्व खाडे यांच्यासह प्राची बगाटे, श्याम मारणे, गायत्री लांडे, वैभव जमदाडे, शंकर मोटे, दिनेश अंबुरे, अभिजीत मोडक, हर्षवर्धन राजोपाध्ये आणि योगेश जोगळेकरही उपस्थित होते. गणेशोत्सव हा शहरातील मोठा आणि गर्दीचा उत्सव असल्याने या काळात पोलीस यंत्रणेवर मोठी जबाबदारी असते. उत्सवाच्या काळात पोलिसांनी बजावलेल्या कर्तव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती नवयुग मित्र मंडळ ट्रस्टने दिली.

हे सुद्धा वाचा : तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Web Title: The navyug mitra mandal trust has felicitated the deccan gymkhana police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • ganesh utsav
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

पगार न दिल्याने नगरपालिका कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात पगार जमा
1

पगार न दिल्याने नगरपालिका कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात पगार जमा

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 17 अन्न परवाने निलंबित
2

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 17 अन्न परवाने निलंबित

राज्यातील वातावरणात होतोय बदल; पुण्यात उन्हाचा वाढला चटका, सप्टेंबर कोरडा पण ऑक्टोबर…
3

राज्यातील वातावरणात होतोय बदल; पुण्यात उन्हाचा वाढला चटका, सप्टेंबर कोरडा पण ऑक्टोबर…

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल
4

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.