Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्ह्यातील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी मोहीम; आरटीओकडून 151 ‘ब्लॅक स्पॉट’ची संयुक्त पाहणी सुरू

पुणे शहर आणि जिल्ह्यात सतत वाढणारे रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कंबर कसली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 23, 2026 | 12:40 PM
पुणे जिल्ह्यातील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी मोहीम; आरटीओकडून 151 ‘ब्लॅक स्पॉट’ची संयुक्त पाहणी सुरू

पुणे जिल्ह्यातील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी मोहीम; आरटीओकडून 151 ‘ब्लॅक स्पॉट’ची संयुक्त पाहणी सुरू

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात सतत वाढणारे रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार दिनांक २२ पासून जिल्ह्यातील विविध महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांवरील अपघातप्रवण क्षेत्रांची, म्हणजेच ‘ब्लॅक स्पॉट’ची अत्यंत महत्त्वाची संयुक्त पाहणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

 

रस्त्यावरील जीवघेणे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवण्याच्या उद्देशाने आरटीओने आठ विशेष तज्ज्ञ पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात एकूण १५१ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी ३० क्षेत्रे पुणे आरटीओच्या थेट कार्यक्षेत्रात येतात, तर उर्वरित १२१ ब्लॅक स्पॉट पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील प्रमुख महामार्ग आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवर आहेत.

पुणे जिल्हयातील इतर महामार्गांच्या तुलनेत पुणे-सोलापूर महामार्गावर सर्वाधिक धोका असून, येथे सर्वाधिक ४६ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. या अत्यंत संवेदनशील ठिकाणांच्या पाहणीसाठी दोन रस्ता सुरक्षा पथके विशेषतः तैनात करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे, पुणे-पंढरपूर (जेजुरी) मार्गावर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे सात ब्लॅक स्पॉट नोंदवण्यात आले आहेत.

या मोहिमेत केवळ आरटीओच नाही, तर बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएसएआय), पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि ‘ब्लूमबर्ग’ व ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’ यांसारख्या प्रतिष्ठित सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी देखील संयुक्त पाहणी पथकात सहभागी आहेत. या सर्व प्रमुख विभागांमध्ये आवश्यक समन्वय ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

महामार्गावरील अपघातांचे मुख्य कारण शोधून ही आठ पथके आपला विस्तृत पाहणी अहवाल प्रशासनाला सादर करतील. २५ जूनपर्यंत हा अहवाल सादर केला जाईल, त्यानंतर संबंधित धोकादायक ठिकाणांवर आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना लागू केल्या जातील. – स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

हे सुद्धा वाचा : रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह सापडला अन् उलगडा झाला हत्येचा; नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

Web Title: The rto has launched a special drive to prevent accidents in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • Accident News
  • pune news
  • Pune RTO

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.