काय घडलं नेमकं?
अब्दुल रहमान उर्फ अब्दुल रज्जाक असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो शांतीनगर येथील लाल नगर भागातील रहिवासी होता. पोलीस तपासनूसार, मृत अब्दुलची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी मालधक्का परिसरातील रेल्वे ट्रकजवळ अब्दुलचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, मृत अब्दुलने एक दिवसापूर्वी परमेश्वर पटेलच्या घरात चाकूने हल्ला केला होता आणि त्याच्या बहिणीला तसेच आईला शिवीगाळ केली होती, असा आरोप आहे. (Nagpur Crime) याशिवाय, चोरीच्या एका प्रकरणात मिळालेल्या सुमारे ४ लाख रुपयांच्या वाटणीवरूनही दोन्ही गटामध्ये वाद सुरू होता. याच जुन्या वादातून रविवारी उशिरा रात्री दोन्ही पक्षांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, ज्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्राने अब्दुलचा गळा चिरून त्याची हत्या केली. त्यानंतर घटनास्थळावरून ते फरार झाले. (Nagpur Crime)
आरोपी अटकेत
या घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट-३ ने धडक कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली. राहुल उईके, परमेश्वर उर्फ पप्पू संतोष पटेल आणि एक अल्पवयीन मुलगा असे आरोपींचे नाव आहे. पोलीस या हत्येमागील नेमकं कारण काय याचा तपास करत आहे. (Nagpur Crime)
संतापजनक! मदरसा शिक्षकाकडून 10 अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; आरोपी फरार
नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील ताजबाग परिसराजवळ असलेल्या एका मदरसा शिक्षकाने तब्बल १० अल्पवयीन विद्यार्थ्यांचा लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. याघटनेने नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. (Nagpur Crime)
Beed Crime: भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावला; मध्यस्थी करणाऱ्या हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून
Ans: मृत तरुणाचे नाव अब्दुल रहमान उर्फ अब्दुल रज्जाक (वय 30) असे आहे.
Ans: ही घटना नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का परिसरात घडली.
Ans: जुना वाद, पैशांच्या व्यवहारावरून झालेला संघर्ष आणि पूर्वीच्या भांडणातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय आहे.






