Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पुण्यात हुडहुडी! शहरातील तापमानात कमालीची घट; थंडीचा कडाका वाढला

तापमानातील या घटीमुळे शहरात गारवा वाढला असून पहाटे सोबतच रात्रीच्या वेळी थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. रस्त्यांवर नागरिक स्वेटर, जॅकेट, मफलर अशा उबदार कपड्यांमध्ये वावरताना दिसत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 14, 2025 | 09:06 PM
Pune News: पुण्यात हुडहुडी! शहरातील तापमानात कमालीची घट; थंडीचा कडाका वाढला

Pune News: पुण्यात हुडहुडी! शहरातील तापमानात कमालीची घट; थंडीचा कडाका वाढला

Follow Us
Follow Us:
पुण्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून होतोय बदल
शहरातील स्थिर असलेल्या तापमानात आणखी घट
पहाटे सोबतच रात्रीच्या वेळी जाणवतेय थंडीची अधिक तीव्रता

पुणे: पुण्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा बदल आता अधिक ठळकपणे दिसू लागला आहे. शहरातील तापमानात पुन्हा एकदा घट नोंदवली गेली असून थंडीचा कडाका वाढला आहे. पुणे शहरात गेल्या दोन दिवसापासून स्थिर असलेल्या तापमानात आणखी घट झाली आहे. तापमान १२.६ अंश सेल्सिअस वर गेले असून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील चार दिवस किमान आणि कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.शुक्रवारी (दि. १४) शहरात किमान तापमान हे १२.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदवले गेले.तापमानातील या घटीमुळे शहरात गारवा वाढला असून पहाटे सोबतच रात्रीच्या वेळी थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. रस्त्यांवर नागरिक स्वेटर, जॅकेट, मफलर अशा उबदार कपड्यांमध्ये वावरताना दिसत आहेत. दिवसाच्या वेळी सूर्यप्रकाश असला तरी हवेत गारवा टिकून असल्याने थंडीची जाणीव कायम राहते.भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी घसरण होण्याचा इशारा दिला आहे.

विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस किमान तापमान सुमारे १२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात आणखी घट होऊ शकते. कमाल तापमानातही किंचित कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि स्थानिक हवामानातील बदल यामुळे पुण्यातील थंडी काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामानतज्ञांनी व्यक्त केली आहे.तापमान घटल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी तज्ञांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. उबदार कपडे वापरणे, सकाळच्या थंड हवेत अनावश्यक बाहेर पडणे टाळणे, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता असून पुणेकरांनी सज्ज राहण्याची गरज आहे.

दिनांक              कमाल तापमान       किमान तापमान
१२ नोव्हेंबर         ३०                            १३.७
१३ नोव्हेंबर        ३०                             १३.७
१४ नोव्हेंबर        ३०                            १२.७
१५ नोव्हेंबर         ३०                            १२
१६ नोव्हेंबर         २९                             १२

Web Title: The temperature has dropped pune city and cold has increased weather news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 09:04 PM

Topics:  

  • pune news
  • weather news
  • Winter Season

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.