Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिकेत गर्दीमुळे पदाधिकारी ओळखता येईना; कार्यकर्ता कोण अन्…

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सध्या सभा आणि बैठकीदरम्यान पदाधिकारी ओळखण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 06, 2026 | 02:38 PM
महापालिकेत गर्दीमुळे पदाधिकारी ओळखता येईना; कार्यकर्ता कोण अन्...

महापालिकेत गर्दीमुळे पदाधिकारी ओळखता येईना; कार्यकर्ता कोण अन्...

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सध्या सभा आणि बैठकीदरम्यान पदाधिकारी ओळखण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. महापालिकेतील १२८ सदस्यांपैकी तब्बल ६४ सदस्य नव्याने निवडून आलेले असल्याने अनेकांची अद्याप एकमेकांशी पुरेशी ओळख झालेली नाही. त्यातच कडक पेहरावात मोठ्या संख्येने कार्यकर्ते महापालिकेत वावरत असल्याने नगरसदस्य कोण आणि कार्यकर्ता कोण, हे ओळखणे अवघड होत असल्याचे चित्र आहे.

 

महापालिका निवडणुकीला दीड महिना उलटला असून, सत्तास्थापनेलाही महिना झाला आहे. महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी कामकाज सुरू केले असून, स्थायी समिती आणि विषय समित्यांचेही कामकाज सुरू झाले आहे. मात्र, पहिल्या सर्वसाधारण सभेपासूनच कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून येत आहे.

दरम्यान, १४ मार्च २०२२ पासून महापालिकेत चार वर्षे प्रशासकीय राजवट होती. त्या काळात मोजकेच माजी नगरसेवक महापालिकेत येत असत. यंदा निवडणुकीत अनेक नवे चेहरे निवडून आल्याने त्यांची ओळख सर्वांना झालेली नाही. याबाबत एका नव्या नगरसदस्याने सभागृहात ओळख सत्र घेण्याची मागणीही केली होती. मात्र, अद्याप तसे सत्र झालेले नाही. त्यामुळे सभांमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी आणि ओळखीचा गोंधळ कायम असल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा : जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय

पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली आहे. महापौर रवि लांडगे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. भाजप नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे स्मारक उभारण्याची सूचना केली होती, ज्याला सर्वच पक्षांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. चिंचवड येथील डी-मार्ट समोर ३३.८६ एकर जागेवर महापालिकेची नवीन इमारत साकारत असून, त्यातील ८.६५ एकर जागेवर हे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. महापौर रवि लांडगे यांनी या कामाची तातडीने संयुक्त पाहणी करून प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार महेश लांडगे यांनी या निर्णयाबद्दल महापौर आणि सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले असून, हा निर्णय शहराच्या एकात्मतेला बळ देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Web Title: There is currently a situation of confusion among employees in pimpri chinchwad municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Maharashtra Budget 2026: पर्यटन उद्योगाला अर्थसंकल्पाची खास ‘भेट’; ऐतिहातिक वारसा जपण्यासाठी केली कोटींची तरतूद 
1

Maharashtra Budget 2026: पर्यटन उद्योगाला अर्थसंकल्पाची खास ‘भेट’; ऐतिहातिक वारसा जपण्यासाठी केली कोटींची तरतूद 

PCMC Water Supply: पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागणार कधी? १६७ एमएलडी अतिरिक्त पाण्यासाठी शहरवासीयांची प्रतीक्षा कायम
2

PCMC Water Supply: पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागणार कधी? १६७ एमएलडी अतिरिक्त पाण्यासाठी शहरवासीयांची प्रतीक्षा कायम

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र बजेट २०२६ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा; जाणून घ्या सविस्तर 
3

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र बजेट २०२६ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा; जाणून घ्या सविस्तर 

पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्यांमध्ये ‘जुन्या-नव्यां’चा संगम; तिन्ही मतदारसंघांचे राजकीय समीकरण साधले
4

पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्यांमध्ये ‘जुन्या-नव्यां’चा संगम; तिन्ही मतदारसंघांचे राजकीय समीकरण साधले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.