• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • The Health Of The Citizens Is At Risk Due To The Water In The Mula Mutha River Basin

जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

हवेली तालुक्यातून वाहणाऱ्या मुळा–मुठा नदीच्या पात्रात सध्या जलपर्णी (पाणवनस्पती) मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नदीच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 05, 2026 | 05:57 PM
जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कदमवाकवस्ती : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातून वाहणाऱ्या मुळा–मुठा नदीच्या पात्रात सध्या जलपर्णी (पाणवनस्पती) मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नदीच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. नदीचे पाणी दूषित होत असून जलचर प्राण्यांचा श्वास गुदमरू लागला आहे. परिणामी विविध प्रजातींचे मासे आणि इतर जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा मोठा फटका नदीकाठच्या गावांतील छोट्या-मोठ्या मच्छीमार व्यवसायिकांना बसत आहे.

हवेली तालुक्यातील मांजरी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कोलवडी, अष्टापूर, भवरापूर आदी गावांलगतच्या नदीपात्रात जलपर्णीचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. त्यामुळे नदीचे पात्र पूर्णपणे हिरवेगार झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी जलपर्णी सडून दुर्गंधी पसरली असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या जलपर्णीमुळे हजारो मासे व इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. नदीकाठच्या गावांमध्ये शेतीसाठी सुरू असलेल्या लिफ्ट पाणीपुरवठा योजनांनाही याचा मोठा फटका बसत आहे.

जलपर्णी मोठ्या प्रमाणावर जमा झाल्याने पाणी उपसा यंत्रणा अडथळली असून, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नदीपात्रातील या बदलामुळे नदीचे नैसर्गिक स्वरूपही बिघडत चालले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड व चाकण एमआयडीसी परिसरातील काही उद्योगांमधून सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी तसेच पुणे शहरातील मलजल थेट नदीत सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

डासांची वाढ होऊन विविध आजारांचा धोका वाढला

पूर्वी या नदीवरून अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना होत्या; मात्र आता पाणी पूर्णपणे दूषित झाल्याने नागरिकांना बोअरवेल व विहिरींच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. काही गावांमध्ये तर पाणी विकत घ्यावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामात नदीकाठच्या शेतकऱ्यांनी कांदा, ऊस, ज्वारी, बटाटा, गहू, मका, पालेभाज्या आदी पिकांचे उत्पादन घेतले आहे. मात्र दूषित नदीपाणी पिकांना देताना शेतकऱ्यांच्या हात-पायांना खाज येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच परिसरात डासांची वाढ होऊन विविध आजारांचा धोका वाढला आहे.

व्यापक मोहीम राबविण्याची गरज

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून दरवर्षी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न केले जात असले; तरी अपुरी यंत्रणा आणि सतत वाढणारे प्रदूषण यामुळे समस्या कायम आहे. नदीलगतच्या अनेक गावांमधून ओला-सुका कचरा, प्लास्टिक व बांधकामाचा राडारोडा नदीत टाकला जात असल्याने प्रदूषणात भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी व्यापक मोहीम राबवणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. नदी स्वच्छता अभियान, नदी बचाव मोहीम आणि लोकसहभागातूनच मुळा-मुठा नदीला प्रदूषणमुक्त करण्याचा मार्ग निघू शकतो. अन्यथा विषारी प्रवाह बनलेली ही नदी भविष्यात नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: The health of the citizens is at risk due to the water in the mula mutha river basin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास
1

Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास

नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक; प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश
2

नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक; प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश

Pune ZP : उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार? पक्षाने बोलावली महत्वाची बैठक
3

Pune ZP : उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार? पक्षाने बोलावली महत्वाची बैठक

धरणग्रस्तांना मोठा दिलासा; उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती
4

धरणग्रस्तांना मोठा दिलासा; उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“कुपोषणाचे प्रमाण आणखी…”; मंत्री Aditi Tatkare यांची विधानपरिषदेत महत्वाची माहिती

“कुपोषणाचे प्रमाण आणखी…”; मंत्री Aditi Tatkare यांची विधानपरिषदेत महत्वाची माहिती

Mar 05, 2026 | 07:24 PM
US-Iran War : इराणवर हल्ला अन् रशियाची चांदी! पुतिन यांच्या तिजोरीत पडणार अब्जावधींचा पाऊस?

US-Iran War : इराणवर हल्ला अन् रशियाची चांदी! पुतिन यांच्या तिजोरीत पडणार अब्जावधींचा पाऊस?

Mar 05, 2026 | 07:20 PM
“परमेश्वर करो आता रेबीज वगैरे नको…”; मराठी अभिनेत्याला भटक्या कुत्र्याचा चावा, पोस्ट शेअर करत म्हणाले…

“परमेश्वर करो आता रेबीज वगैरे नको…”; मराठी अभिनेत्याला भटक्या कुत्र्याचा चावा, पोस्ट शेअर करत म्हणाले…

Mar 05, 2026 | 07:10 PM
Sant Tukaram Maharaj: देहूत उसळला भक्तांचा जनसागर; ३७८ वा वैकुंठगमन सोहळा भक्तीरसात संपन्न

Sant Tukaram Maharaj: देहूत उसळला भक्तांचा जनसागर; ३७८ वा वैकुंठगमन सोहळा भक्तीरसात संपन्न

Mar 05, 2026 | 06:58 PM
याला म्हणतात प्रॉपर जुगाड! पठ्ठ्याने फक्त 4 लाखांत Maruti 800 ला बनवलं थेट Lamborghini कार

याला म्हणतात प्रॉपर जुगाड! पठ्ठ्याने फक्त 4 लाखांत Maruti 800 ला बनवलं थेट Lamborghini कार

Mar 05, 2026 | 06:54 PM
Bombay High Court: “पत्नीचं Whatsapp Chat म्हणजे क्रूरता…”, घटस्फोटासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Bombay High Court: “पत्नीचं Whatsapp Chat म्हणजे क्रूरता…”, घटस्फोटासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Mar 05, 2026 | 06:52 PM
उस्ताद झाकीर हुसेन यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त ‘हार्टबीट्स – द म्युझिक विदिन’ चे भव्य पुनरागमन, संगीतप्रेमींसाठी खास अनुभव

उस्ताद झाकीर हुसेन यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त ‘हार्टबीट्स – द म्युझिक विदिन’ चे भव्य पुनरागमन, संगीतप्रेमींसाठी खास अनुभव

Mar 05, 2026 | 06:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.