Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Water Supply: पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागणार कधी? १६७ एमएलडी अतिरिक्त पाण्यासाठी शहरवासीयांची प्रतीक्षा कायम

वाढत्या शहराची गरज ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पात स्वतः लक्ष घातले होते. एमआयडीसी, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयासाठी त्यांनी बैठकाही घेतल्या.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 06, 2026 | 04:19 PM
PCMC Water Supply, Bhama Askhed Project Delay,

PCMC Water Supply, Bhama Askhed Project Delay,

Follow Us
Follow Us:
  • सव्वासहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याचा सामना
  • शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली असून पाणी टंचाईने नागरिक हैराण
  • शहराला दररोज पाणी मिळावे यासाठी महापौर राखी लांडगे यांनी आक्रमक पवित्रा
Pimpri-Chinchwad News: गेल्या सव्वासहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याचा सामना करणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांची प्रतीक्षा संपण्याचे नाव घेत नाहीये. भामा आसखेड पाणी योजनेचे काम वारंवार मुदतवाढ देऊनही पूर्ण न केल्याने, अखेर महापालिका प्रशासनाने निष्क्रिय ठेकेदाराला घरचा रस्ता दाखवला आहे. प्रकल्पाचे उर्वरित ३० टक्के काम पूर्ण करण्यासाठी आता नवीन निविदा प्रक्रिया राबवली जात असून, यामुळे शहराला अतिरिक्त १६७ एमएलडी पाणी मिळण्यास पुन्हा विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune-Mumbai Traffic Jam: पुणे-मुंबई ट्रॅफिक जामला कायमचा ‘ब्रेक’! १३५ किमीचा शिरूर-उरण मल्टिनोडल कॉरिडॉरला हिरवा कंदील

लोकसंख्येचा टप्पा ३० लाखांच्या पार, तक्रारीत वाढ

शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली असून पाणी टंचाईने नागरिक हैराण आहेत. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांसह विरोधकांनीही प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. निवडणुकांनंतर दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींत मोठी वाढ झाली असून, भामा आसखेड प्रकल्पाच्या दिरंगाईमुळे शहरवासीयांमध्ये तीव्र रोष आहे.

प्रकल्पाची सद्यस्थिती आणि अडथळे

एकूण जलवाहिनी: २६.१० किलोमीटर (७० टक्के काम पूर्ण).

खर्च: १६३ कोटी २४ लाख रुपये अपेक्षित.

अडथळे: विविध विभागांकडून जागा मिळण्यास झालेला विलंब, शेतकऱ्यांचा विरोध आणि ठेकेदाराची संथ गती.

सध्याची स्थिती: ७.३० कि.मी.ची अशुद्ध जलवाहिनी आणि १८.८० कि.मी.ची शुद्ध जलवाहिनी टाकण्याचे काम अपूर्ण.

मुख्यमंत्र्यांचे लक्ष तरीही प्रशासन ‘ढीम्म’

वाढत्या शहराची गरज ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पात स्वतः लक्ष घातले होते. एमआयडीसी, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयासाठी त्यांनी बैठकाही घेतल्या. मात्र, वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा होऊनही स्थानिक पातळीवर अधिकारी आणि ठेकेदारांच्या वेळकाढूपणामुळे हा प्रकल्प रेंगाळला असल्याचा आरोप होत आहे.

मेट्रो प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगची चिंता आता लवकरच मिटणार; महापालिकेचे सर्वेक्षण

डेडलाईनचा फोलपणा

२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात तत्कालिन आयुक्त शेखर सिंह यांनी हे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मार्च २०२६ उजाडला तरी ३० टक्के काम शिल्लकच आहे. यामुळे प्रशासनाने शहरवासीयांची फसवणूक केल्याची भावना निर्माण झाली आहे.

महापौरांचा ‘अल्टिमेटम’

शहराला दररोज पाणी मिळावे यासाठी महापौर राखी लांडगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. २० फेब्रुवारीच्या सभेत त्यांनी पाणीपुरवठा विभागाला १३ मार्चपर्यंत नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. महापौरांच्या या आदेशाचे पालन प्रशासन वेळेत करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित ३० टक्के कामासाठी तातडीने अल्पमुदतीची निविदा काढण्यात येत असून, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

— श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

 

 

Web Title: Road home for failed contractor of bhama askhed new tender process begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • Water supply

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

कचरा कोंडीवरून पिंपरी महापालिकेत रणकंदन; मोशी डेपोला टाळे ठोकण्याचा नगरसेवकांचा इशारा
2

कचरा कोंडीवरून पिंपरी महापालिकेत रणकंदन; मोशी डेपोला टाळे ठोकण्याचा नगरसेवकांचा इशारा

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई
3

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई

भक्ती-शक्ती चौक ते चाकण मेट्रो मार्गाला महापालिकेची मंजुरी; 12 हजार 937 कोटींच्या आराखड्यास मान्यता
4

भक्ती-शक्ती चौक ते चाकण मेट्रो मार्गाला महापालिकेची मंजुरी; 12 हजार 937 कोटींच्या आराखड्यास मान्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.