पुण्यात 'पाणीबाणी'! टँकरच्या चार लाख फेऱ्या; यंदा 4 हजारांनी फेऱ्या वाढल्या, पाण्याची मागणी वाढली
पुणे: एकीकडे समान पाणी पुरवठा (चाेवीस तास) याेजनेचे काम सुरु असले तरी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा त्याच प्रमाणात वाढत आहे. यावर्षी टॅंकरच्या सुमारे चार लाख ४ हजार इतक्या फेऱ्या झाल्या अाहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात चार हजारांनी वाढ झाली आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे शहरात पाण्याची मागणीत वाढ हाेत आहे. गेल्या दोन महिन्यांत टॅंकरच्या फेऱ्या वाढत आहे. जानेवारी महिन्यात ३९ हजार ६९२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. त्याचवेळी फेब्रुवारी महिन्यात ३८ हजार ५२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. 2
024-25 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 4 लाख 4 हजार 340 टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख ५९ हजार ४५८ कंत्राटदारांच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गतवर्षी एकूण 4 लाख 348 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता, त्यापैकी 3 लाख 45 हजार 846 टँकरने ठेकेदारांच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.
मार्च महीन्यानंतर आकडेवारीत वाढ
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरद्वारे पाणीपुरवठा होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. यात विशेष बाब म्हणजे मार्च महिन्याची आकडेवारी अद्याप त्यात समाविष्ट करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत हा आकडा आणखी वाढू शकतो.पुणे महापालिका नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी खडकवासला धरण आणि भामा आसखेड धरणातून पाणी उचलते.
Pune Water News: उन्हाळा वाढला! पुण्यात पाण्याची मागणी वाढली; मात्र ‘या’ कारणामुळे नागरिक त्रासले
चाळीस काेटी रुपये हाेतात खर्च
टँकरद्वारे वर्षाला 40 कोटींहून अधिक खर्च होतोशहरातील विविध भागांतील पाणीपुरवठा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केला जातो. अनेक भागात पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तर काही गावांमध्ये पाणीपुरवठा पाइपलाइनचे जाळे नसल्यामुळे टँकरद्वारे मोफत पिण्याचे पाणी पुरवठा केला जातो. मोफत पाणीपुरवठ्यावर महापालिका दरवर्षी 40 ते 42 कोटी रुपये खर्च करते. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येते.
यावर्षी जानेवारी महिन्यापासून वाढत्या उन्हामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरे आणि आसपासच्या गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी वाढली आहे. ज्या भागात पाणीटंचाई आहे, त्या भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी महापालिकेने पर्वती, वडगाव शेरी, धायरी, रामटेकडी, चतुश्रृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा सात वेगवेगळ्या ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. या टँकर पॉइंट्सवरून महापालिकेच्या मालकीचे टँकर आणि कंत्राटदाराच्या टँकरच्या मागणीनुसार पाणीपुरवठा केला जातो.
पुण्यात पाण्याची मागणी वाढली
वाढत्या उन्हामुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रासले आहेत. अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने माजी नगरसेवक तसेच राजकीय नेते थेट तक्रारी घेत तसेच स्थानिक नागरिकांसह पाणीपुरवठा विभागावर मोर्चा घेवून जात आहेत. त्यावर पाणीपुरवठा सुरळीत केला जात असून वाढीव २ एमएलडी पाण्याचा पुरवठा सुरु केला जात आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.