Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद

तिरंगा गौरव समिती पुणे यांच्यावतीने मंगळवारी (दि. ११) तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीनिमित्ताने वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. दुपारी दोन वाजल्यापासून रॅली संपेपर्यंत हा वाहतूक बदल असणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 10, 2026 | 06:10 PM
तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून 'हे' मार्ग राहणार बंद

तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून 'हे' मार्ग राहणार बंद

Follow Us
Follow Us:

पुणे  : तिरंगा गौरव समिती पुणे यांच्या वतीने मंगळवारी (दि. ११) तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीनिमित्ताने वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. दुपारी दोन वाजल्यापासून रॅली संपेपर्यंत हा वाहतूक बदल असणार असून, फर्ग्युसन कॉलेज रोड तसेच रॅलीच्या मार्गाला जोडणारे काही उपरस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी दिले आहेत.

असा आहे रॅलीचा मार्ग

ही रॅली ललित महल हॉटेल चौक ते ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, गुडलक चौक आणि गरवारे चौक या मार्गावरून जाणार आहे. रॅलीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यकतेनुसार वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

असा आहे वाहतुकीत बदल

खंडोजीबाबा चौक ते गरवारे ब्रिज चौक हा मार्ग बंद राहणार आहे. स्वारगेटकडून पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी अलका चौक, खंडोजीबाबा चौक, वीर सावरकर चौकाकडे न जाता भाऊसाहेब पाटील चौक, ना. सी. फडके चौक, मंगळवारवाडा चौक, सेनादत्त चौक, बालशिवाजी, म्हात्रे पूल, नळ स्टॉप आणि लॉ कॉलेज रोडमार्गे जावे. तसेच स्वारगेटकडून खडकी/जुना पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी भाऊसाहेब पाटील चौक, पुरम चौक, बाजीराव रोड, गाडगीळ पुतळा, कुंभार वेस आणि आरटीओ चौक हा पर्यायी मार्ग सुचविण्यात आला आहे. दरम्यान, गरवारे चौक ते चाफेकर चौक (एफ.सी. रोड) तसेच गरवारे चौक ते तुकाराम पादुका चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, ललित महल चौक ते चाफेकर चौक या मार्गांवरही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी रॅलीच्या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा : पुरंदरच्या ग्रामसेवकांची पंचायत समितीत रंगली आखाड पार्टी, घरकुलांच्या कामाकडे दुर्लक्ष; सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

पर्यायी मार्ग

गरवारे चौक परिसरातून जाणाऱ्या वाहनांसाठी लॉ कॉलेज रोड, एस.बी. रोड, विद्यापीठ चौक तसेच भांडारकर रोड, बी.एम.सी.सी. रोड, चतु:शृंगी रोड, मॉडेल कॉलनी रोडमार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहतूक पोलिस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा : अमोल बालवडकरांचा भाजपच्या तिरंगा रॅलीला जोरदार विरोध;15-20 हजार गाड्यामुळे वाहतूक कोंडीची भीती

Web Title: Traffic arrangements in pune have been altered on tuesday due to the tiranga rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Police
  • Traffic Police

संबंधित बातम्या

वडगाव एमआयडीसी महामार्गावरील वाहतूक सुरळीत! विशाल लॉन्स चौकातील वाहतूक कोंडीवर पोलिसांनी काढला तोडगा
1

वडगाव एमआयडीसी महामार्गावरील वाहतूक सुरळीत! विशाल लॉन्स चौकातील वाहतूक कोंडीवर पोलिसांनी काढला तोडगा

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
3

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
4

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.