Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि.२०) सायंकाळी होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 19, 2025 | 04:42 PM
विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि.२०) सायंकाळी होणार आहे. या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून, बुधवारी लोकार्पण झाल्यानंतर रहदारीसाठी हा उड्डाणपुल खुला करण्यात येईल. परिणामी वाहनधारकांसह नागरिकांना या भागातून प्रवास करणे सुकर होणार असल्याची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.

पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसेच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दिर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून यासाठी अंदाजित २७७ कोटीच्या अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त आहे. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच अस्तित्वातील वाहतुकीस पुरेसा रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून गणेशखिंड रस्त्याचे पुणे विद्यापीठ ते भारतीय कृषी महाविद्यालय या लांबीमध्ये पुणे मनपा विकास आराखड्यानुसार ४५ मी. पर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे.

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर या उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध – शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सांग‍ितले.

ऑगस्ट २०२२ पासून कामाला सुरुवात

या उड्डाणपुलाच्या आराखड्यास प्राधिकरण सभा, कार्यकारी समिती, पुणे महानगरपालिका व पुणे एकीकृत महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास ऑगस्ट २०२२ पासून प्रारंभ करण्यात आला होता. या कामासाठी शासनाने २६/०५/२०२० रोजीच्या पत्रान्वये मेट्रो सवलतकार कंपनी व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे दरम्यान स्वाक्षांकित करावयाच्या पूरक सवलत करारनामाच्या मसुद्यास मान्यता दिली होती. तत्पूर्वी, अस्तित्वातील दोन एकेरी वाहतुकीचे उड्डाणपूल ऑगस्ट २०२० मध्ये शासनाच्या मान्यतेने पाडण्यात आले होते. यानंतर संबंध‍ित उड्डाणपुलाचे काम सुरु केले होते. मुख्य विद्यापीठ चौकामध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी ५५ मी. लांब स्टील गर्डर बसवण्यात आला आहे.

मेट्रो प्रकल्प

माण – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन – ३ या २३.२०३ किमी उन्नत मेट्रो प्रकल्पाचे बांधकाम प्रगतीपथावर असून आजपर्यंत ८८. ५१ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. मेट्रो स्थानक क्र. १९ चे बांधकाम विद्यापीठ चौक येथे प्रगतीपथावर असून मेट्रो स्थानक व औंध, बाणेर आणि पाषाण या तिन्ही रस्त्यांना जोडण्यासाठी मेट्रो जिना प्रस्तावित केला आहे.

  • एकूण १.७ किमी लांबी
  • औंध ते शिवाजीनगर १.३० किमी लांबी
  • ३ लेन रोड
  • ९.५ मीटर रुंदी
  • दोन खांबामधील अंतर २८ मीटर
  • प्रकल्पाची किंमत रु. २७७ कोटी

Web Title: Traffic congestion at punes vidyapeeth chowk is about to be resolved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद
1

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
2

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
3

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट
4

Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.